पर्यटनस्थळे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन
By | Updated: December 5, 2020 04:06 IST2020-12-05T04:06:19+5:302020-12-05T04:06:19+5:30
औरंगाबादमधील स्मारके व पर्यटन स्थळे सुरू करा, या मागणीसाठी फाउंडेशनकडून वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने मागणी होत आहे. या मागणीची दखल ...

पर्यटनस्थळे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन
औरंगाबादमधील स्मारके व पर्यटन स्थळे सुरू करा, या मागणीसाठी फाउंडेशनकडून वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने मागणी होत आहे. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला शुक्रवारी चर्चेसाठी बोलावले होते.
पर्यटन सुरू करताना कोविड १९ चा प्रसार होणार नाही, ही जबाबदारीही आपली सर्वांचीच आहे. आपल्या सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद बघून पर्यटनाशी संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर उघडण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
एटीडीएफचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, अंजली प्रताप, सुनील चौधरी, अन्नू कपूर, अमोद बसोले, राहुल निकम, तेजंदरसिंग गुलाटी, पपिंदरपाल सिंग वायटी, सुष्मिता जाना रॉय, एमटीडीसीचे सहायक संचालक विजय जाधव आणि एएसआयचे अजित कंधारकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
फोटो कॅप्शनः –
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना स्मारके व पर्यटनस्थळे सुरू करण्यासाठी निवेदन देताना औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे शिष्टमंडळ.