जामीन अर्जावरील निर्णय लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 00:51 IST2016-03-24T00:22:23+5:302016-03-24T00:51:36+5:30
अंबाजोगाई : शहर ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चाटे आत्महत्या प्रकरणातील सातही आरोपी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात गेले होते.

जामीन अर्जावरील निर्णय लांबणीवर
अंबाजोगाई : शहर ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चाटे आत्महत्या प्रकरणातील सातही आरोपी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात गेले होते. बुधवारी न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय ३० मार्चपर्यंत पुढे ढकलला आहे.
चाटे आत्महत्या प्रकरणात उपअधीक्षक नीलेश मोरे, निरीक्षक श्रीराम पौळ, सहायक निरीक्षक बाबासाहेब बोरसे, योगेश गुजर, डॉ. गुजर व अन्य दोघन यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून सर्व आरोपी फरार आहेत.
तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी आजारी रजा घेतली होती. या सर्व आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी न्या. एस. ई. हंडे यांनी जामीन अर्जावरील निर्णय ३० मार्चपर्यंत राखून ठेवला आहे.
यापैकी पौळ आणि बोरसे या दोघांची अधीक्षक अनिल पारसकर यांनी बुधवारी नियंत्रण कक्षात बदली केली. या बदलीच्या आदेशाला पारसकर यांनी दुजोरा दिला. (वार्ताहर)