दलित अत्याचार विरोधात निषेध मोर्चा
By Admin | Updated: May 15, 2014 00:05 IST2014-05-14T22:57:52+5:302014-05-15T00:05:05+5:30
अंबाजोगाई: दलितांवरील वाढते अन्याय व अत्याचार याच्या विरोधात अण्णा भाऊ साठे युवा आंदोलनाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला

दलित अत्याचार विरोधात निषेध मोर्चा
अंबाजोगाई: महाराष्ट्रात दलितांवरील वाढते अन्याय व अत्याचार याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी अण्णा भाऊ साठे युवा आंदोलनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना देण्यात आले. अण्णा भाऊ साठे युवा आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये रोज दलितांवर अन्याय, अत्याचाराची मालिका चालू आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. शासन व प्रशासन ह्या घटनांकडे लक्ष देत नाही. फक्त फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांची नावे घ्यायची व सत्ता हस्तगत करायची व जातीवादाला खतपाणी घालायचे काम करीत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राची परिवर्तनवादी जनता सहन करणार नाही. दलितांवरील अत्याचार रोखण्यास शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. यासाठी खालील मागण्या घेऊन राज्यातील दलित अत्याचार विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मागण्या दत्ता काळेच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणार्या पोलिस अधिकार्यांवर अॅट्रासिटी अॅक्ट कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करणे. दत्ता काळे, संजय गायकवाड, नितीन आगे, उमेश आगळे, मनोज कसाब यांच्या खुनांचा तपास सी.आय.डी. किंवा सी.बी.आय. मार्फत करण्यात यावा. वरील सर्व पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन करा. अॅट्रासिटी अॅक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जळवबन येथील वैरागे या तरुणीस आत्महत्या करण्यास भाग पाडणार्या आरोपींवर कडक कारवाई करावी. नगर व बीड जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहिर करण्यात यावा. त्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी. या मागण्या पूर्ण करण्यास शासन व प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर संघटना रस्त्यावर उतरेस असा इशारा देण्यात आला. या मोर्चात दशरत कांबळे, अविनाश हजारे, धिमंत राष्ट्रपाल, अशोक पालके, बळीराम उपाडे, अमोल काळे, समाधान काळुंके, अॅड. लोखंडे, पांडुरंग जोगदंड, हिरामण पाटोळे, जोगदंड मारुती, महादेव हजारे, दत्ता उपाडे, संतोष पारधे, अमोल वाघमारे, अर्चना वायदंडे, मनीषा काळे, कमलाकर जोगदंड, संतोष पारधे, अमोल खरात, मुन्ना सरवदे, लक्ष्मण कांबळे, आदींची उपस्थिती होती. या मोर्चाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (वार्ताहर)