वकिलांकडून कामबंद आंदोलन करून निषेध

By Admin | Updated: March 17, 2015 00:40 IST2015-03-17T00:14:53+5:302015-03-17T00:40:33+5:30

जालना : अलाहाबाद येथील जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ नबी अहेमद यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा जिल्हा वकील संघाच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करून निषेध केला.

Prohibition by the agitated agitation by advocates | वकिलांकडून कामबंद आंदोलन करून निषेध

वकिलांकडून कामबंद आंदोलन करून निषेध


जालना : अलाहाबाद येथील जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ नबी अहेमद यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा जिल्हा वकील संघाच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करून निषेध केला.
वकील संघाचे अध्यक्ष सय्यद तारेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत आज दुपारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात रामेश्वर गव्हाणे, राजेंद्र सोळुंके, महेश धन्नावत, वाल्मिक घुगे, सी.डी. देशपांडे, आर.बी. पडोळ, दीपक नाईक, अमजद अली, अरविंद मुरमे, एस.एम. कुलकर्णी, राजेंद्र डुरे, लक्ष्मण उढाण, केशव घोगरे, अर्शद बागवान, डी.के. कुलकर्णी, अल्ताफ पठाण, भूषण तवरावाला, सुबोध किनगावकर, बी.एम. साळवे, नवमहालकर, सुर्वे, महेश वाघुडे, सत्यकुमार करंडे, गणेश डहाळे, वायाळ, मोरे, लाखे, प्रदीप पटेल, खेडवाल, मोगल, संजीव गायकवाड यांच्यासह वकील संघाच्या सदस्यांचा सहभाग होता.
अलाहाबाद येथील घटनेच्या निषेधार्थ जिल्हा वकील संघाच्या सर्व सदस्यांनी कामबंद आंदोलन केल्याने आज न्यायालय परिसरात शुकशुकाट होता. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition by the agitated agitation by advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.