शहरांच्या विकासाला गती की कोलदांडा ?
By Admin | Updated: July 14, 2016 00:40 IST2016-07-14T00:40:43+5:302016-07-14T00:40:43+5:30
उस्मानाबाद: नव्या सरकारने नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

शहरांच्या विकासाला गती की कोलदांडा ?
दप्तर दिरंगाईचा फटका : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
तुमसर : आयुष्याच्या शेवटी तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ५६ सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित आहेत. सर्व सोपस्कार पार पाडून फाईल जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर एक वर्षापाूसन पडून आहे. स्वाक्षरी अजूनपर्यंत झाली नाही. शासकीय दप्तरदिरंगाईचा फटका या शिक्षकांना बसत आहे.
तुमसर तालुक्यातील सुमारे ५६ सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षकांना निवड श्रेणी लागू झाली नाही. सेवानिवृत्त शिक्षकांत यामुळे तिव्र असंतोष आहे. आयुष्याची शेवटच्या उंबरठ्यावर या सर्व शिक्षकांनी कागदपत्रांची सर्व पूर्तता केली. पंचायत समितीमध्ये अनेकदा जावून नियमानुसार सोपस्कार पार पडले. पंचायत समितीकडून रितसर निवड श्रेणीचा प्रस्ताव भंडारा येथे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला.
मागील एक वर्षापासून जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल्स पडून आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांनी स्वाक्षरी केली नाही अशी माहिती आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकरणे आल्यावर स्वाक्षरी करण्यात येईल असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला अशी माहिती आहे. भंडारा येथे या शिक्षकांना जायला वयामुळे जमत नाही, थरथरते हात, कमी दृष्टी व अवयवात शिथिलता आल्याने आता जाता येत नाही अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या. सर्वाधिक प्रकरणे तुमसर तालुक्यातील आहेत. (तालुका प्रतिनिधी)