शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

...अन् पोलीस आयुक्तांनी चार तास ठाण मांडले; संशयाची सुई कुटुंबियांकडे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 14:21 IST

Professor murder case in Aurangabad : घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. दरवाजेही तोडण्यात आलेले नाहीत.

ठळक मुद्दे  तपासासाठी चार अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन

औरंगाबाद : हायप्रोफाईल वस्तीतील प्राध्यापकाचा खून करण्यात आल्यामुळे सोमवारी सकाळी ९.३० वाजता पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर त्यांनी मृत्यू पावलेले डॉ. राजन शिंदे यांच्या कुटुंबियांशी स्वत: सविस्तर चर्चा केली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांच्या उपस्थितीत घरातील प्रत्येक कोपरान् कोपरा तपासला, त्यानंतर शेजारच्या घरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. तब्बल चार तास पोलीस आयुक्त घटनास्थळी ठाण मांडून होते.

मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाची घटना सकाळी उघडकीस येताच पोलीस दलात खळबळ उडाली. रविवारी रात्री बजरंग चौकात दारू पिण्याच्या कारणावरुन एकाचा खून झाल्याची घटना ताजी असताना हा प्रकार समोर आला होता. महाविकास आघाडीच्या बंदमुळे शहरात पोलीस बंदोबस्त लावला होता. त्या पार्श्वभूमीवरही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेच्या उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रम्हा गिरी, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक प्रवीण पोटे यांच्यासह उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळावरील तांत्रिक बाबी त्यांनी बारकाईने गोळा केल्या. तसेच डॉ. राजन यांच्या दोन्ही गाड्या, घर, परिसराची तपासणी करण्यात आली. श्वानपथकाला पाचारण केले होते. हा सर्व तपास पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच घटनास्थळाच्या परिसरात राहणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही संबंधित कुटुंब, नातेवाईकांची माहिती गोळा करण्यात येत होती. चार तासांनंतर पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन घटनास्थळ सोडले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत घाटी रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणीही इनकॅमेरा करण्यात आली.

संशयाची सुई कुटुंबियांकडेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिंदे यांच्या घराचे सर्व दरवाजे आतून बंद होते. घरात त्यांच्यासह पत्नी, दोन मुले आणि आई-वडील होते. घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. दरवाजेही तोडण्यात आलेले नाहीत. डॉ. शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात दिसल्यानंतर पोलिसांना तत्काळ कळविले नाही. पोलीस येण्यापूर्वीच हॉलमध्ये सांडलेले रक्त पुसून घेण्यात आले. तसेच बाहेरून घरात कोणी आल्याच्या पायाचे ठसे आढळले नाहीत. केवळ घरातील हॉल ते खोलीपर्यंतच एकाच्या तळपायाचे ठसे पाहणीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गृह कलहातून हा प्रकार तर झालेला नाही ना? कुटुंबातील कोणाचा यात सहभाग आहे का, यादृष्टीनेही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष तपास पथक स्थापनया खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात चारजणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. यात आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ता शेळके आणि सायबरचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांचा समावेश आहे.

लवकरच आरोपी गजाआडघटनास्थळ बारकाईने तपासले. चोरीच्या उद्देशाने घटना घडल्याचे दिसून आलेले नाही. खून झालेल्या डॉ. राजन शिंदे यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनाची माहिती जमा केली. आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. विविध बाजूंनी तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात टीम नियुक्त केली आहे. लवकरच आरोपींपर्यंत पोलीस पोहोचून गुन्हा उघड करतील.- डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त

हेही वाचा :- थरारक ! दारूच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; अवघ्या तीन सेकंदांत चाकूने भोसकून केला घात- शिक्षण क्षेत्र सुन्न! प्राध्यापकाचा गळा, हाताच्या नसा कापून निर्घृण खून

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस