कर्मचाऱ्यास अश्लिल मॅसेस पाठविणारा प्राध्यापक गजाआड

By Admin | Updated: April 22, 2016 00:25 IST2016-04-21T23:59:07+5:302016-04-22T00:25:39+5:30

भोकरदन : येथील एका महाविद्यालयातील कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर राजूर येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने अश्लिल एसएमएस पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला.

Professor GazaAad, who was sent to the staff, | कर्मचाऱ्यास अश्लिल मॅसेस पाठविणारा प्राध्यापक गजाआड

कर्मचाऱ्यास अश्लिल मॅसेस पाठविणारा प्राध्यापक गजाआड


भोकरदन : येथील एका महाविद्यालयातील कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर राजूर येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने अश्लिल एसएमएस पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे पोलिसांनी सदर प्राध्यापकाविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
भोकरदन येथील रविकिरण दिनकरराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , परमेश्वर जनार्दन दहिवाळ (३३, रा़ तीर्थपुरी ) यांने फिर्यादी रविकिरण मोरे यांना २ ते २० एप्रिल दरम्यान मोबाईलवर अश्लिल एसएमएस केले होते. त्यानंतर फिर्यादी हा भोकरदन बसस्टॅडवर आला असता संशयित आरोपीने त्यास तुला मी मेसेजेस टाकले आहे. तू काय करतो ते करून घे, अशी धमकी दिली. त्यावरून फिर्यादीने आरोपीस भोकरदन पोलिसाच्या ताब्यात देऊन त्याच्याविरूध्द तक्रार दिली. त्यावरून आरोपी विरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात ५०१,५०४,५०६, सह ६६ अ, ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे हे करीत आहे़

Web Title: Professor GazaAad, who was sent to the staff,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.