शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. लोंढे हत्या प्रकरण: विसरलेले ३ हजार रुपये अन् 'त्या' दोघींच्या जबाबाने रीलस्टार अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:11 IST

प्रा. लोंढे हत्या प्रकरण: 'दृश्यम' स्टाईल हत्येचा पोलिसांनी असा केला उलगडा; ३३ सीसीटीव्ही अन 'त्या' दोन महिलांच्या जबाबाने रीलस्टार विशालचे गुपित फुटले

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुबराव लोंढे (६०, रा. ज्योतीनगर) यांची रीलस्टार विशाल विकास राठोड (२४) याने मेव्हणा आकाश विनोद पवार (३२, दोघे रा. गेवराई तांडा) याच्यासह मिळून डोक्यात गोळी झाडून हत्या केली. महिनाभरानंतर सिनेस्टाइल या हत्येचा उलगडा झाला. जवळपास ३० दिवस विशाल, आकाशने पोलिसांची दिशाभूल केली. मोबाइलच्या तांत्रिक तपासातही तो अडकत नव्हता. सुरुवातीला पोलिसांनी नोंदवलेल्या १७ जणांच्या जबाबांपैकी विशालची एक मैत्रीण व फार्महाउसवर पैसे विसरलेल्या एका महिलेच्या जबाबाने लोंढे यांच्या हत्येचा शनिवारी धक्कादायकरीत्या उलगडा झाला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक ज्योतीनगरात एकटेच वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंब पुण्यात राहते. एका कार्यक्रमादरम्यान ओळख झालेल्या विशालसोबत त्यांची सारख्याच सवयींमुळे घट्ट मैत्री झाली. त्यांचे सतत बाहेर जाणे, पार्ट्या सुरू झाल्या. रिॲलिटी शोच्या बहाण्याने त्याने लोंढे यांच्याकडून ५० लाखांवर रक्कम घेतली होती. मात्र, तसा कुठलाही शो सुरू झाला नाही. या आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात वाद सुरू झाला. २८ जानेवारीला पार्टीत त्यांच्यात वाद होत लोंढे यांनी विशालच्या संपर्कातील एका महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. तेव्हापासून विशालच्या डोक्यात लोंढे यांच्या विषयी राग होता.

२ फेब्रुवारीची रात्र अहिल्यानगरातत्या वादानंतरही तिघेही २ फेब्रुवारीला अहिल्यानगरला गेले होते. त्याचदरम्यान विशालने लोंढेंच्या हत्येचा कट रचत गावाकडे गड्डे खोदून ठेवले होते. पुन्हा ६ फेब्रुवारीला दौलताबाद फार्महाउसला गेले. तेथे दोन महिला रिक्षाने फार्महाउसवर पोहोचल्या. येथेच पार्टी, नाचगाणे झाल्यानंतर दोघी त्याच रिक्षाने शहरात परतल्या.

'पैसे दिले असते; पण तुम्ही तसे बोलायला नको होते'विशालने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, दोन्ही महिला गेल्यानंतर तिघेही सोबतच फार्महाउसबाहेर पडले. नगरनाक्यावर थांबून त्यांनी आणखी अन्य एका ठिकाणी जाण्याचा बेत आखला. छावणी लोखंडी पूल ओलांडल्यानंतर विशालने त्यांचा २८ जानेवारीच्या वादाचा विषय काढला. 'सर, तुम्ही तसे बोलायला नको होते, मी तुम्हाला पैसे देणारच होतो', असे म्हणताच लोंढे यांनी त्याला शिवीगाळ केली. लोंढे यांनी पुन्हा विशालच्या संपर्कातील त्या महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि विशालने थेट पिस्तूल त्यांच्या कानाच्या मागे ठेवत गोळी झाडली.

३० दिवस, ३३ सीसीटीव्ही कॅमेरे, २५४ फुटेज आणि 'दोघींचा' जबाब-७ फेब्रुवारीला लोंढे यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार झाली. तेव्हापासून पोलिस तांत्रिक तपासासह लोंढे यांचा चालक, नातेवाईक, मित्र, विशाल, आकाशसह संपर्कातील प्रत्येकाची चौकशी करत होते. विशालचा हत्येच्या दिवशी मोबाइल अनेकदा सुरू-बंद झाल्याचे समोर आले. फार्महाउसवरील दोघींपैकी एक महिला तीन हजार रुपये तेथेच विसरल्याने घरी पोहोचल्यावर तिने विशालला सातत्याने ८ ते १० कॉल केले. त्यानंतर विशाल एका मैत्रिणीलाही भेटला.-ही बाब विशालने लपवली होती. त्या दोघींच्या जबाबाने विशालच्या उत्तरातील तफावत समोर आली आणि त्यानेच आखलेल्या जाळ्यात तो अडकत गेला. त्याचदरम्यान पोलिसांनी विशाल फिरलेल्या मार्गावरील ३३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे २५४ फुटेजचे सबळ पुरावे गोळा केले होते. १ मार्चला संशय बळावल्याने पोलिसांचे दोन गुप्त बातमीदार गेवराई तांड्यात थांबून विशालच्या हालचाली टिपत होते.

हत्येनंतर चहा, दारू पिली, जेवण केल्यानंतर मृतदेह पुरलाछावणी पुलापुढे हत्येनंतर गोलवाडी फाटा, पाटोदा शिवारात जात विशालने लोंढेंचा समोरील सीटवरील मृतदेह मागच्या सीटवर ठेवला. त्यानंतर रेल्वेस्थानकावर चहा पिला. विशालने एका मैत्रिणीला शहानूरमिया दर्गा चौकात जेवणाचा डब्बा घेऊन बोलावले. तिच्याकडून डब्बा घेत थेट गेवराई तांडा गाठले. करण विलास आडे (२२) याला बोलावून घेत तिघांनी दारू पिली. मैत्रिणीने दिलेला डब्बा खाल्ला. त्यानंतर गाडीत मृतदेह पाहून करणही हादरला. त्याला धमकावत सकाळी लोंढे यांचा मृतदेह पुरला. घरी जाऊन सकाळी ११ वाजता विशालने गाडीदेखील धुतली.

तीन महिन्यांपूर्वी विवाहविशालला एक लाला नावाचा सिनेमा काढायचा होता. त्याने त्यासाठी पैसे जमवण्यास सुरुवात केली होती. शिवाय, तीन महिन्यांपूर्वी त्याने लपून एका मुलीसोबत लग्नही केले होते. पोलिसांना त्या लग्नाचा व्हिडीओ प्राप्त होताच पोलिसांनी त्या मुलीचीही चौकशी केली. मात्र, तीदेखील या सर्व घटनेपासून अनभिज्ञ होती. विशालच्या मोबाइलमध्ये अनेक मुलींसोबतची छायाचित्रे मिळून आली. पोलिस निरीक्षक संग्राम ताटे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गोळी डोक्यातच अडकून राहिलीविशालने लोंढे यांच्या उजव्या कानाच्या मागे पिस्तूल ठेवून गोळी झाडली. ती डाव्या बाजूला डोक्यातच अडकून राहिली. रक्तस्रावदेखील झाला नाही. मृतदेहाच्या एमआरआयमध्ये ती गोळी आढळून आली. दरम्यान, हत्येत वापरलेले पिस्तुल लोंढे यांचे नसल्याचा संशय पोलिसांना आहे. विशालने कोणाकडून आणले, त्याला कारसाठी पैसे कोणी दिले, याचा पोलिस शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Professor Londhe Murder: Forgotten Rupees, Women's Statements Trap Reelstar

Web Summary : Reelstar Vishal Rathod and accomplice murdered Professor Londhe over financial disputes and offensive comments. A forgotten 3000 rupees and statements from two women exposed Rathod's lies, leading to his arrest after a month-long investigation involving CCTV footage and technical analysis.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी