शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. लोंढे हत्याकांड: गुन्ह्यांत ॲट्रॉसिटीच्या कलमांची वाढ, व्यवहारांच्या माहितीसाठी पोलिसांचा बँकेला पत्रव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:37 IST

मुख्य मारेकरी विशाल राठोड २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत, आकाशची न्यायालयीन कोठडीत रवानगी

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुबराव लोंढे (६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम वाढवण्यात आले आहे. तर मंगळवारी मारेकरी रीलस्टार विशाल विकास राठोड (२४) व त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार (३२, दोघे रा. गेवराई तांडा) यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यात न्यायालयाने विशालच्या पोलिस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ केली तर मेव्हणा आकाशची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

६ फेब्रुवारीला बेपत्ता झालेल्या लोंढे मिळून येत नसल्याने कुटुंबाकडून उस्मानपुरा ठाण्यात त्यांच्या बेपत्ताची तक्रार नोंदवली होती. १४ मार्चला सबळ पुराव्यांसह त्यांची हत्या करून गेवराई तांडा परिसरात पुरल्याचे निष्पन्न झाले. १४ मार्चला यात विशाल व आकाशला अटक केली. लोंढे यांचा मृतदेह पुरण्यात मदत करणाऱ्या करण विलास आडे (२२) याला रविवारी अटक केली. मंगळवारी विशाल व आकाशच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपला. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी शासनातर्फे तर के.जी. भोसले यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली.

दोघांचा न्यायालयात पोलिसांवर मारहाणीचा आरोपदुपारी ४ वाजता पोलिसांनी विशाल, आकाशला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. तेव्हा दोघांनी सुरुवातीलाच पोलिसांनी मारहाण करून कुटुंबाला धमकावल्याचा आरोप केल्याने पोलिसही अचंबित झाले. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. दोघांची खासगीत प्रश्न करुन प्राथमिक चौकशी केली. यामुळे सुनावणी काही काळ थांबवण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने आकाशच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊन पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्याची सूचना केली. तपासणीत आकाशच्या शरीरावर काही जखमा आढळल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

ॲट्रॉसिटीचे कलम, तपास एसीपींकडेसदर गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम (ॲट्रॉसिटी) वाढवण्यात आले आहे. कायद्यानुसार, ॲट्रॉसिटीचा तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) अशोक राजपूत यांच्याकडे तपास वर्ग करण्याचे आदेश जारी केले.

या मुद्द्यांवर होणार तपास- प्रा. लोंढे यांच्या मोबाईलचे विशालने काय केले?- गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल त्याने कोणाकडून घेतले?- लोंढे यांच्याकडून घेतलेल्या लाखो रुपयांचे विशालने काय केले? त्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार केला.- पैशांव्यतिरिक्त लोंढे यांच्याकडील मौल्यवान वस्तू आरोपींनी घेतल्याचा दाट संशय आहे. त्याबाबत चौकशी होणार.- हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणखी कोणासोबत लोंढे यांचे आर्थिक व्यवहार होते?

English
हिंदी सारांश
Web Title : Professor Londhe Murder: Atrocity Charges Added, Bank Details Probed

Web Summary : Professor Londhe's murder case adds atrocity charges. Accused remanded; police investigate financial transactions, potential accomplices, and missing valuables. Allegations of police brutality surface.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर