चाऱ्याअभावी घटले दुधाचे उत्पादन
By Admin | Updated: December 14, 2014 00:13 IST2014-12-14T00:12:31+5:302014-12-14T00:13:03+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात मांजरा तालुका संघ व लातूर जिल्हा दुध संघ यांच्या माध्यमातून दुध संकलनाचे कार्य केले जात आहे़

चाऱ्याअभावी घटले दुधाचे उत्पादन
बाळासाहेब जाधव , लातूर
लातूर जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात मांजरा तालुका संघ व लातूर जिल्हा दुध संघ यांच्या माध्यमातून दुध संकलनाचे कार्य केले जात आहे़ या माध्यमातून दिवसाकाठी ४४ हजार ६६९ लिटर्स दूध संकलन होत असले तरी गतवर्षीच्या प्रमाणात दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्सची घट झाली आहे़
लातूर जिल्ह्यात मांजरा दूध संघाच्या १२ दुध संस्थेमार्फत प्रतिदिनी ३ हजार ५६१ लिटर्स दूध संकलन केले जाते़ तर जिल्हा संघांतर्गत १४९ दुध संस्थेअंतर्गत १३ हजार १७४ लिटर दुधाचे संकलन केले जाते़ तसेच ५ खाजगी दूध प्रकल्पाद्वारे सरासरी २७ हजार ९३७ लिटर्स दुधाचे दिवसाकाठी संकलन केले जाते़ लातूर जिल्ह्यात १० लाख १४ हजार ७१४ एवढे पशुधन आहे़
तर ७ लाख ८० हजार ६४५ टन चारा उपलब्ध आहे़ हा चारा एप्रिल अखेरपर्यंत पुरेल असा दावा पशुधन विकास अधिकारी करीत असले तरी पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस दूध उत्पादनात मोठी घट होत आहे़
दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने पशुधनाच्याही संखेत मोठी घट होत आहे़ लातूर जिल्ह्यात सहकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र या दोन्ही क्षेत्रातून ४४ हजार ६६९ लिटर्स एवढे प्रतिदिन दुध संकलन केले जाते़ सरासरी गतवर्षीच्या तुलनेत दूध उत्पादनाचा विचार केला तर गतवर्षीच्या प्रमाणात साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट झाल्याचे दिसून येत आहे़ ४
गतवर्षीच्या प्रमाणात जिल्ह्यातील दुध उत्पादनात दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट होत असली तरी अनंद मिल्क या एजन्सीने लातूर व बीड जिल्ह्यातील भाव प्रतिलिटर २ रुपयाने कमी केला आहे़ हा निर्णय आजपासून लागू होणार असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीत सर्वसामान्य नागरीकांना आधार मिळाला आहे़