अवघ्या सतरा दिवसांत निघतेय तुतीचे उत्पादन...!
By Admin | Updated: December 28, 2016 00:06 IST2016-12-28T00:04:18+5:302016-12-28T00:06:31+5:30
जालना : नवीन तंत्रज्ञानानुसार आता तुतीचे उत्पादन अवघ्या सतरा दिवसांत निघत आहे.

अवघ्या सतरा दिवसांत निघतेय तुतीचे उत्पादन...!
जालना : नवीन तंत्रज्ञानानुसार आता तुतीचे उत्पादन अवघ्या सतरा दिवसांत निघत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शेतकरी अवलंब करीत असून, त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे. यावर्षांत जिल्ह्यात १०१ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन निघून शेतकऱ्यांनी सुमारे ४ कोटींचे उत्पादन मिळविले आहे.
राज्यात मराठवाडा उत्पादनात द्वितीय स्थानी असून, विदर्भात जालना जिल्ह्याच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. जिल्ह्यात ९४१ एकरवर ८९१ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली होती. जुन्या लागवड पद्धतीऐवजी नवीन पद्धत आली आहे. आता शेतकऱ्यांना थेट तुतीच्या अळ्या देण्यात येतात. यातून पंधरा ते सतरा दिवसांत हे उत्पादन निघते. तुतीपासून रेशीमचा भाव प्रति क्विंटल ३० ते ४० हजार क्विंटल दरम्यान आहे. १०१ मेट्रिक टन पाहता याद्वारे शेतकऱ्यांना तब्ब्ल चार कोटी रूपयांचे उत्पादन निघाल्याची माहिती विभागीय रेशी उपसंचालक दिलीप हके यांनी सांगितले. राज्यात तुती लागवड ८३३६ एकर एवढी होती. त्यापैकी ४०९८ एकर क्षेत्र मराठवाड्यात आहे. क्षेत्राचा विचार करता मराठवाड्यात ३४४ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन झाले. तर जालना जिल्ह्यात १०१ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन निघाले आहे. नवीन शेतकऱ्यांना लागवडीसाठी जानेवारीपासून शेतकऱ्यांनी तयारी करावी. नवीन तंत्रज्ञानानुसार शेतकऱ्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे हके यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला एक चांगला पर्याय म्हणून रेशीम शेती असून, याचा जिल्ह्यातील शेतकरी फायदा घेत आहे. इतर शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीकडे वळावे म्हणून रेशीम कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)