नगर पंचायतींची प्रक्रिया रखडलेलीच

By Admin | Updated: December 22, 2014 23:50 IST2014-12-22T23:50:28+5:302014-12-22T23:50:28+5:30

जालना : जिल्ह्यातील चार तालुकास्थाने असूनही तेथे नगर पालिका नाही. गावाचा विस्तार होत आहे. परंतु विकास कामे करताना अनेक अडचणी येत आहेत

The process of Nagar Panchayat has remained the same | नगर पंचायतींची प्रक्रिया रखडलेलीच

नगर पंचायतींची प्रक्रिया रखडलेलीच


जालना : जिल्ह्यातील चार तालुकास्थाने असूनही तेथे नगर पालिका नाही. गावाचा विस्तार होत आहे. परंतु विकास कामे करताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे या तालुकास्थानांना नगर विकास विभागाने नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय आठ ते नऊ महिन्यांपूर्वी घेतला. एवढा कालावधी उलटूनही ही प्रक्रिया जैसे थेच आहे. दर्जा कधी मिळणार याची प्रतीक्षा या तालुक्यांना लागली आहे.
मंठा, जाफराबाद, घनसावंगी व बदनापूर हे चार तालुके आहेत. तालुक्यात नगर पालिका वगळता अन्य सर्व शासकीय कार्यालये येथे आहेत. फक्त पालिका नसल्याने ग्रामपंचायतीच्या मर्यादित अधिकारावरच कसबशी विकास कामे होत आहेत. नगरपंचायत झाल्यास या तालुकास्थानांचा चौफेर विकास होण्यास मदत होणार आहे. असे असले तरी आठ ते दहा महिने उलटूनही नगर विकास विभागाच्या लालफितीच्या कारभारात ही पंचायत अडकल्याची भावना या तालुक्यांतून व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी या नगर पंचायतींसाठी हरकती मागविण्यात आल्या होत्या. हरकतींचे नंतर काय झाले, निर्णय कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
नगर पंचायतींचा दर्जा ग्रामपंचायतींपेक्षा मोठा असतो. विकास कामे होण्यासही मदत मिळते. यात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सक्षमता, शहर परिसराचा विकास, पथदिवे तसेच प्रत्येक प्रभागात अंतर्गत रस्ते, प्रत्येक वार्डात पाणीपुरवठा, कचरा व सांडपाण्याची व्यवस्था लावणे आदी कामांसाठी विशेष निधी मिळविता येतो.
विशेष म्हणजे चार तालुकास्थाने मोठे व्यापारी केंद्रे आहेत. असे असले तरी ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. नगर पालिका दूरच पण नगर पंचायतींसाठी या गावांना अनेक वर्षे झगडावे लागले. आता या चार तालुकास्थांना पंचायतींचा दर्जा मिळाला असला तरी या पंचायती प्रत्यक्षात कधी अस्तित्वात येणार हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)४
जाफराबाद, बदनापूर, मंठा व घनसांवगी गावांना नगर पंचायतींचा दर्जा मिळणार आहे. ग्रामंपंचायती निकाली निघूल पंचायत होणार असल्याने याद्वारे विकास होण्यास मदत होणार आहे. नगर विकास विभाग पंचायतींचा निर्णय कधी घेणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. नवीन वर्षात या ग्रामपंचायतींना पंचायतींचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.
४या चार तालुकास्थानच्या नगरपंचायतींबाबत निर्णय शासन घेणार आहे. शासनाच्या आदेश येताच पुढील प्रक्रिया पार पडले, अशी माहिती जिल्हाधिकारी रंगानायक यांनी दिली.

Web Title: The process of Nagar Panchayat has remained the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.