शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लहू गटकाळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:02 IST

विष्णूनगर येथील व्यापाºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेतील लहू श्रीरंग गटकाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या कारवाईने खळबळ : संघटित गुन्हे करणाऱ्या अन्य टोळ्याही आयुक्तांच्या रडारवर

औरंगाबाद : विष्णूनगर येथील व्यापाºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेतील लहू श्रीरंग गटकाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.रवींद्र बाळासाहेब तोगे (रा. विष्णूनगर), अंकुश रामभाऊ मंडलिक (रा.सातारा परिसर), गणेश रामनाथ जोशी (रा. द्वारकानगरी, बजाजनगर), अशी गटकाळच्या साथीदारांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, आरोपी लहू गटकाळ हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. बडतर्फीनंतर तो वाळू व्यावसायिक बनला. आरोपी गटकाळ हा टोळीप्रमुख आहे. साथीदारांसह धारदार शस्त्राने दंगा करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, चोरी करणे, धाकधपटशा करणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्याने केलेले आहेत. गटकाळ आणि टोळीच्या गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विष्णूननगर येथील एका व्यापारी पिता-पुत्रावर त्याने प्राणघातक हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १७ मार्चच्या मध्यरात्री घडली. याविषयी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी गटकाळसह तिघांना अटक करून न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात पाठविले. त्याचा अन्य एक साथीदार गणेश जोशी जामिनावर आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांच्या निदर्शनास आले की, अवैध वाळू वाहतूक करताना गटकाळने गुन्हेगारांची टोळी तयार केली आणि तो त्याच्या विरोधकांना प्राणघातक हल्ले करून जिवे मारण्याचा प्रयत्न करतो. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना समजताच, त्यांनी गटकाळ आणि त्याच्या टोळीविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर आरोपींविरोधात आज मोक्काचे कलम लावण्यात आले.चौकटतपास सहायक आयुक्त कोडे यांच्याकडेपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने गटकाळ आणि टोळीविरुद्धचा गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्याकडे सोपविला. या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईची प्रक्रिया पोलीस आयुक्त, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त एच. एस.भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलीस हवालदार द्वारकादास भांगे, सुनील बडगुजर, नाना हिवाळे, अजय आवले यांनी पार पाडली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी