‘कर्जमाफी नको, पण आॅनलाईन आवरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:58 IST2017-08-30T00:58:26+5:302017-08-30T00:58:26+5:30
कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची दिवसभर बँका व महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी उसळत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढतो आहे.

‘कर्जमाफी नको, पण आॅनलाईन आवरा’
शेख महेमूद ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची दिवसभर बँका व महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी उसळत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढतो आहे. काही केंद्रांवर शेतकºयांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय
घेतला.
कर्जमाफीसाठी शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्याची अट घातली आहे. मात्र, आॅनलाइन अर्ज भरताना शेतकरी घामाघूम होत आहेत. कर्जमाफीचे पोर्टल वारंवार हॅँग होत असल्यामुळे अर्ज भरण्याची प्रकिया कासवगतीने सुरू आहे. अर्ज भरताना केंद्रावरील कर्मचारीही वैतागले आहेत.
एक अर्ज भरण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे एका केंद्रावर दिवसभरात अवघे ५० ते ६० अर्ज भरले जातात. कर्जमाफीसाठी शेतातील कामे सोडून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी सकाळपासून घराबाहेर पडावे लागते; परंतु दिवसभरात अर्ज भरण्यासाठी नंबर लागेलच याची शाश्वती नसते.
तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलत नाही. आॅनलाइन अर्ज भरताना अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. त्याशिवाय आधार कार्डाचा डेटा लिंक होत नाही. म्हणून शेतकºयांना तासन्तास रांगेत उभे राहावे
लागते.
गंगापूर तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जवळपास १५ हजार व विविध राष्टÑीयीकृत बँकेचे ४ हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. आतापर्यंत केवळ ५ हजारांच्या आसपास शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. अनेक पात्र लाभार्थी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती शेषराव चक्रे, उदय चव्हाण, शेख हमीद, विनायक शिंदे, सुनीता जाधव, अंबादास मातकर आदींनी केली आहे.