जिल्हा रुग्णालयात समस्या वाढल्या
By Admin | Updated: August 13, 2014 00:25 IST2014-08-13T00:10:31+5:302014-08-13T00:25:13+5:30
हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली.

जिल्हा रुग्णालयात समस्या वाढल्या
हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अर्धवट कामांमुळे वाढत्या असुविधांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मनोज जैन यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बोरसे यांची भेट घेऊन सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन, सोनोग्राफी व विविध उपकरणे संबंधित तंत्रज्ञ नसल्याने बंद आहेत. रुग्णांना त्यासाठी बाहेर मोठा खर्च सहन करावा लागत आहे. तर अर्धवट बांधकामामुळे अनेक विभाग सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या रुग्णांनाही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जैन यांनी केली. त्यावर डॉ.बोरसे यांनी या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पाण्याची समस्या लक्षात घेता मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयास पाच हजार लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या देण्याचे ठरले. तसेच त्यांची जोडणीही करून देण्यात आली आहे. यावेळी आरएमओ डॉ.रोडगे, डॉ.मुनोद, डॉ.दीपक मोरे, प्रशांत बगडिया, सुरेश संचेती आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)