बसस्थानकास समस्यांचा विळखा

By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-14T00:23:23+5:302014-07-14T01:00:37+5:30

एम़जी़मोमीन , जळकोट प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा येथील बसस्थानकात मिळत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैैरसोय होत आहे़

Problems with the bus station | बसस्थानकास समस्यांचा विळखा

बसस्थानकास समस्यांचा विळखा

एम़जी़मोमीन , जळकोट
प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा येथील बसस्थानकात मिळत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैैरसोय होत आहे़ पाण्याचा अभाव, बंद शौचालय, विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रण कक्षही बंद असल्याने चौकशी तरी कोणाकडे करावी, असा सवाल प्रवाशांसमोर उभारत आहे़
जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असल्याने एस़टी़महामंडळाच्या वतीेने प्रवाशांची सोय व्हावी म्हणून बसस्थानकांची निर्मिती केली़ परंतु, सद्य:स्थितीला हे बसस्थानक विविध समस्यांत अडकले आहे़ उन, पावसातून आलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी बसस्थानकात आसने निर्माण करण्यात आली आहेत़ परंतु, या आसनांची साफसफाई केली जात नसल्याने धुळीचे थर साचले आहेत़ त्याचबरोबर काही भंगार वस्तुही बसस्थानकात टाकण्यात आल्या आहेत़
उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना पिण्यासाठी थंड पाणी मिळावे म्हणून पाण्याच्या टाकीची उभारणी करण्यात आली़ परंतु, आजपर्यंत या टाकीत थेंबभरही पाणी पडले नसल्याने प्रवाशांना नजिकच्या हॉटेलवर तहान भागवावी लागत आहे़ महिला प्रवाशांची कुचंबना होऊ नये म्हणून शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे़ परंतु, शौचालयात पाण्याची व्यवस्थाच नसल्याने केवळ नावालाच शौचालय असल्याचे पहावयास मिळत आहे़ त्याचबरोबर दररोज सायंकाळी ६ नंतर उदगीर आगाराच्या बसेस बसस्थानकात येत नाहीत़ चालक-वाहकाच्या मनमानी कारभारामुळे बसस्थानकात थांबलेल्या प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ परिणामी ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या एस़टी़महामंडळाने चौकशी नियंत्रण कक्ष सुरु केले आहे़ मात्र हे नियंत्रण कक्ष कुलूपबंद अवस्थेत आहे़ त्यामुळे या भागात नवीन आलेल्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे़
बसस्थानकातील समस्या अथवा एसटीच्या वेळेची माहिती विचारण्यासाठी अधिकारीच नसल्याने गैरसोय होत आहे़ त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे़
जळकोट येथील बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याची माहिती नव्हती़ प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एस़टी़महामंडळ कटीबद्ध आहे़ पाण्याच्या व्यवस्थेबरोबरच शौचालय सुरु करण्यात येईल़ बसस्थानकाची स्वच्छता करण्यात येईल़ बसस्थानकात बसेस घेऊन न जाणाऱ्या वाहक व चालकांना सूचना करण्यात येतील, असे उदगीरचे आगार प्रमुख एस़आऱबाशा यांनी सांगितले़

Web Title: Problems with the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.