शहरातील मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:02 IST2021-09-03T04:02:16+5:302021-09-03T04:02:16+5:30
डमी क्रमांक ११३३ शहरात स्थूलता ही समस्या दीड वर्षापासून शहरातील शाळा आणि उद्यानांना कुलूप होते. परिणामी, मुले घरातच ...

शहरातील मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली
डमी क्रमांक ११३३
शहरात स्थूलता ही समस्या
दीड वर्षापासून शहरातील शाळा आणि उद्यानांना कुलूप होते. परिणामी, मुले घरातच बसून होती. या कालावधीत मुले एक तर मोबाईलवर गेम खेळत अथवा अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करीत. नाहीतर टीव्ही पाहात बसत. अनेक मुलांना जेवण करताना टी.व्ही. आणि मोबाईल पाहण्याची सवय लागल्याने त्यांचे वजन वाढले. अतिपोषणामुळे शहरातील मुलांची स्थूलता वाढल्याची समस्या दिसून येते.
.-----------------------
लठ्ठपणाची ही आहेत कारणे
- भूक असेल- नसेल तरीही खाणे, फास्टफूड आणि तळलेले पदार्थ जास्त खाणे, टी.व्ही, मोबाईल पाहत जेवण करणे, रात्री उशिरा जेवणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे.
---------------------
प्रतिक्रिया..........................
दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने माझा मुलगा आणि मुलीचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शाळेचा क्लास संपताच तो ऑनलाइन गेम खेळतो. मुले जेवणाच्या वेळा पाळत नाहीत आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. याचा परिणाम मुलांच्या प्रकृतीवर होतो, सतत मोबाईलच्या वापरामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे.
- प्रा. उमा कदम.
---------------------------
जिल्ह्यात १ हजार २२८ अतितीव्र कुपोषित बालके
औरंगाबाद जिल्ह्यात ० ते ६ वयोगटांतील १ हजार २२८ अतितीव्र, तर ६ हजार ८७७ मध्यम प्रकारची कुपोषित बालके असल्याचे समोर आले. आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभाग यांच्यावतीने जिल्ह्यातील कुपोषित बालकांसाठी विशेष शोधमोहीम राबविली जात आहे. त्यांना सकस आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे.