विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:52 IST2017-09-08T00:52:36+5:302017-09-08T00:52:36+5:30
कुलगुरूंनी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना निलंबित केले.

विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यापीठात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या राजकारणासंदर्भात विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी वादग्रस्त पोस्ट व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्याचा आरोप पँथर्स रिपब्लिकन पार्टी आणि स्वाभिमानी मुप्टा संघटनेने केला. तसेच जनसंपर्क अधिकाºयाच्या निलंबनासाठी कुलगुरूच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे कुलगुरूंनी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना निलंबित केले.
पँथर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व माजी मंत्री गंगाधर गाडे आणि स्वाभिमानी मुप्टाचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची गुरुवारी दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन देऊन विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट तयार करून व्हॉटस्अॅपवरून व्हायरल केल्याचा आरोप केला. या पोस्टमुळे समाजात बदनामी झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कागदपत्रे सादर केली. जनसंपर्क अधिकाºयांचे निलंबन केल्याशिवाय दालनातून बाहेर पडणार नसल्याचा पवित्रा घेतला. शेवटी कुलगुरूंनी जनसंपर्क अधिकाºयांचे निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत.