उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांना बक्षीस
By Admin | Updated: August 24, 2014 00:34 IST2014-08-24T00:34:35+5:302014-08-24T00:34:35+5:30
परभणी : आगामी पोळा, गणेशोत्सव आणि निवडणुका या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांना १० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी केली़

उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांना बक्षीस
परभणी : आगामी पोळा, गणेशोत्सव आणि निवडणुका या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांना १० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी केली़
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने येथील पोलिस मुख्यालयात २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील पोलिस पाटलांची कायदेविषयक कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेस १७५ पोलिस पाटील उपस्थित होते़ यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक रोकडे म्हणाले, ग्रामीण भागात कायदा व शांतता राखण्यासाठी पोलिस पाटील महत्त्वाचे योगदान देऊ शकतात़ त्यासाठी पोलिस पाटलांनी जागरुक राहणे आवश्यक आहे़, असेही ते म्हणाले़ यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनीही मार्गदर्शन केले़ कार्यक्रमात पोलिस अधीक्षक रोकडे यांच्या हस्ते पोलिस पाटील मार्गदर्शिकेचे विमोचन करण्यात आले़ या प्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर, उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर आदींची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी शेंद्रे, इनामदार, वंदना आदोडे, वर्षा कोल्हेकर, बालाजी रेड्डी, शब्बीर, इनामदार, रियाज, राजेश आगासे, दत्ता चिंचाणे, मुलगीर, सुरेश टाकरस आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)