खाजगी शिकवणी सरकारच्या ‘पोर्टल’वर !
By Admin | Updated: April 16, 2016 00:13 IST2016-04-15T23:54:29+5:302016-04-16T00:13:52+5:30
उस्मानाबाद : कायम सेवेत असलेल्या गुरूजींना खाजगी शिकवणी घेता येत नाही. असे असतानाही उमरगा तालुक्यातील अनेक शिक्षकांकडून खाजगी शिकवणी घेतली

खाजगी शिकवणी सरकारच्या ‘पोर्टल’वर !
चौकशीचे आदेश : कायमस्वरूपी सेवेत असूनही घेतात शिकवणी
बाबूराव चव्हाण ल्ल उस्मानाबाद
उस्मानाबाद : कायम सेवेत असलेल्या गुरूजींना खाजगी शिकवणी घेता येत नाही. असे असतानाही उमरगा तालुक्यातील अनेक शिक्षकांकडून खाजगी शिकवणी घेतली जात असल्याची तक्रार प्रोफेश्नल टिचर्स असोशिएशनने ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर नोंदविली. याची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले. लागलीच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत कलम २८ अंतर्गत कायम सेवेत असणाऱ्या कोणत्याही शिक्षकाला खाजगी शिकवणी घेता येणार नाही. असे असतानाही उमरगा तालुक्यातील जवळपास १९ शाळांतील काही शिक्षकांकडून कायद्याला बगल देत मागील काही वर्षांपासून खाजगी शिकवणी घेतल्या जात आहेत. याबाबत प्रोफेश्नल टिचर्स असोशिएशन (पीटीएमए) उमरगा शाखेच्या वतीने २०१५ पासून पाठपुरवा केला जात आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये तहसील प्रशासनाला पत्र देवून संबंधितांविरूद्ध कारवाईची मागणी केली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये तहसीलदारांन पत्र दिले. असे असतानाही अपेक्षित कार्यवाही झाली नाही. त्यामुळे असोशिएनशनच्या वतीने ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर २ एप्रिल २०१६ रोजी तक्रार नोंदविली. दरम्यान, पोर्टलवर तक्रार दाखल होताच वरिष्ठ कार्यालयाने या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हास्तरीय यंत्रणेला दिले. त्यानुसार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला सदरील आदेश प्राप्त झाले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांकडूनही लागलीच चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत. चौकशीसाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे या चौकशीतून आता काय समोर येते? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
‘बीओं’ची नियुक्ती : अहवाल शासनाला द्यावा लागणार
असोसिएशनच्या वतीने उपरोक्त तक्रार ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर करण्यात आली आहे. सदरील तक्रारीची वरिष्ठ कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे उपरोक्त प्रकरणाची शिक्षण विभागाकडून सखोल चौकशी करून अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. दरम्यान, या चौकशीतून तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित शिक्षकांविरूद्ध ‘आटीई’ कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
इतर तालुक्यांतही
गुरुजींची खाजगी शिकवणी जोरात
उमरगा तालुक्यातील तब्बल १९ शाळांतील कायम सेवेतील शिक्षकांकडून खाजगी शिकवणी घेतली जात आहे. ताक्ररीनंतर हा प्रकार उजेडात आला आहे. इतर तालुक्यांतून अद्या अशा स्वरूपाच्या तक्रारी झालेल्या नसल्या तरी खाजगी शिकवणी जोरात सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराकडे तालुकास्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज पालकांतून व्यक्त होत आहे.