खासगी ट्रॅव्हल्सची ‘सुसाट’भाडेवाढ
By Admin | Updated: October 27, 2016 00:53 IST2016-10-27T00:39:01+5:302016-10-27T00:53:16+5:30
औरंगाबाद : दिवाळीसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानी भाडे वसुलीला सामोरे जावे लागत आहे. ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीवर

खासगी ट्रॅव्हल्सची ‘सुसाट’भाडेवाढ
औरंगाबाद : दिवाळीसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानी भाडे वसुलीला सामोरे जावे लागत आहे. ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने एकाच शहरासाठी वेगवेगळे दर आकारले जात आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ सुसाट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांद्वारे औरंगाबादहून नागपूर, मुंबई, लातूर, सोलापूर, ठाणे, बोरिवली, अमरावती, सातारा, कोल्हापूर, इंदूर, अहमदाबाद यांसह विविध आंतरराज्य आणि विविध मार्गांवर बससेवा चालविली जाते. विदर्भातून नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त शहरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहे. आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्यासाठी त्यांची प्रवासाची लगबग सुरू आहे. प्रवासासाठी अनेक जण ट्रॅव्हल्सला प्राधान्य देतात; परंतु अवघ्या ६०० ते ७०० रुपयांमध्ये होणाऱ्या प्रवासासाठी आता तब्बल १५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी चढ्या भाडेवाढीला सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने विविध ट्रॅव्हल्सचालकांकडे औरंगाबाद-नागपूर प्रवास भाड्याची विचारणा केली. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भाडे सांगण्यात आले.