खाजगी १६ ट्रॅव्हल्स जप्त
By Admin | Updated: November 4, 2014 01:39 IST2014-11-03T00:30:34+5:302014-11-04T01:39:06+5:30
लातूर : वाहनांची कंपनीने दिलेल्या आकारापेक्षा अधिक लांबी वाढविणे तसेच आपत्कालीन खिडकी व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात

खाजगी १६ ट्रॅव्हल्स जप्त
लातूर : वाहनांची कंपनीने दिलेल्या आकारापेक्षा अधिक लांबी वाढविणे तसेच आपत्कालीन खिडकी व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार लातूरच्या पथकाने ११ व उस्मानाबादच्या पथकाने ५ खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या १६ ट्रॅव्हल्स लातूरच्या एस.टी. डेपोत लावण्यात आल्या आहेत.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांविरुद्ध राज्यभर कारवाई मोहीम सुरू आहे. त्यानुसार लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागानेही पथकांची स्थापना करून ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत लातूरच्या पथकाने ११ खाजगी ट्रॅव्हल्स जप्त केल्या आहेत. तर उस्मानाबादच्या पथकाने ५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करून जप्त करण्यात आलेली सर्व वाहने लातूर येथील एस.टी. डेपोच्या प्रांगणात लावण्यात आली आहेत. या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
शिवाय, वाहनांची लांबी वाढविणाऱ्या वाहनांची मात्र नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया होईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर.टी. गिते यांनी दिली.
लातुरात गेल्या तीन दिवसांपासून खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी जोरात सुरू आहे. इन्शुरन्स, टॅक्स, वाहन परवाना याबरोबरच वाहनांच्या लांबीत वाढ, आपत्कालीन खिडकी या बाबींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यात दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स आरटीओच्या पथकाकडून जप्त करण्यात येत आहेत. सध्या १६ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. दिवाळी संपताच या मोहिमेला गती आली आहे. (प्रतिनिधी)
आसन क्षमतेसह ट्रॅव्हल्सच्या आकारासंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहीम उपप्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत लातूर कार्यालयाने केलेल्या कारवाईत ११ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तर उस्मानाबाद कार्यालयाने केलेल्या कारवाईत ५ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. अशा एकूण १६ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही पथकांनी जप्त केलेल्या ट्रॅव्हल्सची नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. तूर्तास या ट्रॅव्हल्स लातूर एस.टी. डेपोच्या प्रांगणात लावण्यात आल्या आहेत.