खाजगी वैद्यकीय प्रवेश; ‘त्या’ निर्देशांना आव्हान

By Admin | Updated: October 8, 2016 01:11 IST2016-10-08T01:01:57+5:302016-10-08T01:11:20+5:30

औरंगाबाद : एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीच्या रिक्त जागा सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे न भरता, प्रत्येक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी ‘निट’

Private medical admission; Challenge those directions | खाजगी वैद्यकीय प्रवेश; ‘त्या’ निर्देशांना आव्हान

खाजगी वैद्यकीय प्रवेश; ‘त्या’ निर्देशांना आव्हान


औरंगाबाद : एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीच्या रिक्त जागा सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे न भरता, प्रत्येक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी ‘निट’ परीक्षेच्या निकालानुसार स्वत:ची गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्याच्या वैद्यकीय संचालकांच्या निर्देशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर शुक्रवारी (दि.७) प्राथमिक सुनावणी झाली. पुढील सुनावणी सोमवारी होईल.
मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप) वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश होणे आवश्यक होते. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्यास सांगितले. प्रत्येक महाविद्यालयाने स्वत:ची गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यास सांगितले. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सर्व महाविद्यालयांत अर्ज केले. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक महाविद्यालयात पोहोचू शकला नाही. म्हणून महाविद्यालयांनी त्यांच्या मर्जीनुसार गुणवत्ता यादी बनवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. प्रवेश रद्द करून पुन्हा नव्याने ५३४ जागा भराव्यात, अशी याचिका रेणुका चंदनशिव हिने अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्याद्वारे सादर केली.

Web Title: Private medical admission; Challenge those directions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.