अटी-शर्तीसह खाजगी रुग्णालयांना मुभा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:51+5:302021-06-09T04:06:51+5:30
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा खासगी रुग्णालयांच्या वेगवेगळ्या अडचणी मागील एक महिन्यापासून अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये एकही कोरोना ...

अटी-शर्तीसह खाजगी रुग्णालयांना मुभा देणार
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
खासगी रुग्णालयांच्या वेगवेगळ्या अडचणी
मागील एक महिन्यापासून अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये एकही कोरोना रुग्ण दाखल झालेला नाही. रुग्णालयाचा मासिक खर्च काढणेही प्रशासनाला कठीण जात आहे.
कोविड सेंटर बंद करून इतर आजारांसाठी रुग्णालय सुरू करायचे असेल तर त्यापूर्वी संपूर्ण रुग्णालयात निर्जंतुकीकरण करावे लागते.
रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार, मेन्टेनन्स, बँकांचे हप्ते आदी खर्च भागविणे कठीण जात आहे.
अनेक खाजगी रुग्णालये सध्या कोविड सेंटर्स बनल्याने इतर आजारांचे रुग्ण तेथे येण्यास तयार नाहीत.
शहरात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण मराठवाडा व इतर जिल्ह्यांतून येत आहेत. बहुतांश रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे काही खाजगी रुग्णालयांनी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.