‘स्पेशालिटी’ला तिलांजली देत खासगी रुग्णालये कोविडमध्ये रूपांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:03 IST2021-05-13T04:03:26+5:302021-05-13T04:03:26+5:30

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रूपांतर हळूहळू कोविड रुग्णालयात होत आहे. शहरात डेडिकेटेड ...

Private hospitals converted to 'covid' by giving away 'specialty' | ‘स्पेशालिटी’ला तिलांजली देत खासगी रुग्णालये कोविडमध्ये रूपांतरीत

‘स्पेशालिटी’ला तिलांजली देत खासगी रुग्णालये कोविडमध्ये रूपांतरीत

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रूपांतर हळूहळू कोविड रुग्णालयात होत आहे. शहरात डेडिकेटेड कोविड रुग्णालयांची (डीसीएच) संख्या १३ पर्यंत पोहोचली आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर (डीसीएचसी) तब्बल ६७ झाले आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी १५ कोविड केअर सेंटर (सीसीसी)निर्माण झाले आहेत.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करण्यास तयार नव्हते. प्रशासनाने शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांना युद्धपातळीवर कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर चार ते पाच रुग्णालयांनी सेवा देण्यास सुरुवात केली. मोठ्या रुग्णालयांना डीसीएच दर्जा देण्यात आला. खासगीतील एका रुग्णाचे बिल किमान दोन ते पाच लाखापर्यंत जात होते. हे पाहिल्यानंतर शहरातील इतर खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे कोविड रुग्णालयाच्या परवानगीसाठी रांग लावली. प्रशासनानेही त्वरित रुग्णालयांना परवानगी दिली. बघता बघता डीसीएच रुग्णालयांची संख्या १३ पर्यंत पोहोचली. डीसीएचसी ६७, सीसीसी १५ सुरू करण्यात आले. याशिवाय ४ खासगी सीसीसीला परवानगी दिली आहे. महापालिकेकडे अजूनही पाच ते सहा रुग्णालयांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मागील काही दिवसांपासून हे रुग्णालय आम्हाला कोविडसाठी परवानगी द्या, अशी मागणी प्रशासनाकडे सातत्याने करीत आहेत.

डीसीएच कोणते, बेड संख्या

घाटी-६३७, एमजीएम-५७३, धुत-१५०, हेडगेवार-१४७, कमलनयन बजाज-१५०, युनायटेड सिग्मा-१००, एशियन सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल-८०, ॲपेक्स हॉस्पिटल-८०, ओरियन सिटी केअर-४३, एमआयटी हॉस्पिटल-५०, माणिक हॉस्पिटल-८०, अजंता सुपर स्पेशालिटी-४४, कृष्णा हॉस्पिटल-११८.

डीसीएचसी रुग्णालये कोणती, बेड संख्या

एएमसी मेल्ट्रॉन- ३७०, सिव्हिल हॉस्पिटल-३००, ईएसआयसी-१५०, जे.जे. हॉस्पिटल-७२, हयात मल्टी स्पेशालिटी-५५, मेडकोवीर हॉस्पिटल-७५, वुई केअर हॉस्पिटल-५०, एकविरा हॉस्पिटल-३०, सावंगीकर हॉस्पिटल-४५, लाइफलाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल-७५, एम्स हॉस्पिटल-८०, न्यू लाईफ बाल रुग्णालय-१०, धनवईसिंह हॉस्पिटल-२०, अल्पाइन हॉस्पिटल-३०, मॅक्स केअर हॉस्पिटल-१६, आशिष हॉस्पिटल-२५, लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल-४४, श्रद्धा हॉस्पिटल-३२, एचएमजी हॉस्पिटल-२५, ग्लोबल इंटरनॅशनल हॉस्पिटल-३०, निमाई हॉस्पिटल-३०, मिलिटरी हॉस्पिटल-२९, साई मेडिसिटी हॉस्पिटल-३५, आयुष हॉस्पिटल-०, गजानन हॉस्पिटल-५०, शंकर चेस्ट हॉस्पिटल-२२, गोल्डन सिटी केअर-२५, आनंदी हॉस्पिटल-३०, ईश्वर हॉस्पिटल- ३५,पंछीया सुपर स्पेशालिटी-२४, ओरियन सिटी केअर-४०, शुभश्री मल्टी स्पेशालिस्ट-२२, राम कृष्ण हॉस्पिटल-१०, औरंगाबाद किडनी हॉस्पिटल-१५, टी पॉईंट मल्टी स्पेशालिस्ट-३१, सनशाईन हॉस्पिटल-४८, नोबल नर्सिंग होम-१४, फोनिक्स हॉस्पिटल-२२, चिरायु हॉस्पिटल-२० आदी.

Web Title: Private hospitals converted to 'covid' by giving away 'specialty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.