खाजगी बस उलटली; २२ प्रवासी जखमी
By Admin | Updated: July 25, 2016 00:37 IST2016-07-25T00:24:15+5:302016-07-25T00:37:11+5:30
उमरगा : तालुक्यातील येळी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात तब्बल २२ प्रवासी जखमी झाले़

खाजगी बस उलटली; २२ प्रवासी जखमी
उमरगा : तालुक्यातील येळी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात तब्बल २२ प्रवासी जखमी झाले़ चालकाने झोपेतच बस चालविण्याचे चूक केल्याने त्याचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून, घटनेनंतर चालक फरार झाला़ अपघातातील सहा गंभिर जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ तर जखमींवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून हैद्राबादकडे जाणारी एक खासगी बस (क्ऱएम़एच़१२- के़जी़३००६) ही रविवारी पहाटेच्या सुमारास जात होती़ चालक झोपेतच गाडी चालवित असल्याने येळी गावाजवळील रामपूर पाटीनजीकच्या ही बस क्लिनरच्या बाजूने झुकल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले़ प्रवाशांनी चालकाला सुचना देईपर्यंत त्याने बस पुढेच नेली़ येळी गावाजवळ ही बस आली असता भाऊसाहेब बिराजदार विद्यालयानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली़ भरधाव वेगात पलटी झाल्याने ही बस १०० ते १५० मीटर घसरत गेली़ या अपघातात साखर झोपेत असलेल्या महिला, पुरूषांसह बालकेही जखमी झाली आहेत़ अनेकांच्या हाताला, पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली़ यात आठ पुरूष, आठ महिला व पाच लहान मुले व एका मुलीचा समावेश आहे़ बस पलटी झाल्यानंतर मोठा आवाज आल्याने येळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर पोलिसांनी व जकेकूर, रामपूर येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी जावून जखमींना उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले़ ग्रामस्थांच्या मदतीमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. अपघाताची उमरगा ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़
हे प्रवासी झाले जखमी
४खासगी बस पलटी होवून झालेल्या अपघातात दामोदर दशरथ चव्हाण (वय-६४ रा़ मुळज ता़उमरगा), मोतीराम सुभाष पवार (वय-४० रा़ निलंगा), क्रिश राजू जाधव (वय-०३), निकिता राजू जाधव (०६), राजू परशुराम जाधव (४० सर्व रा़बसवकल्याण), ज्ञानेश्वर जोतीबा शिंदे (४०), प्रमोद ज्ञानेश्वर जाधव (०५ दोघे रा़ उमरगा), विठूबाई दत्तू बनसोडे (२१ रा़ निलंगा), ओंकार गौतम सूर्यवंशी (०४ रा़ अतसूर वाडा निलंगा), राम बिभिषण जगताप (०७ वाडेगाव ता़लातूर), पार्वती सत्यवान सयाजी (३०), माया ब्रम्हानंद भारती (५० दोघी रा़ निलंगा), रवी संतोष पवार (०५ धनेगाव ता़देवणी), छाया मुकुंद पाटील (४५ कोंडजीगड ता़निलंगा), व्यंकट विठ्ठल शिंदे (५०), अंबुलगा ता़निलंगा), निर्मला देविदास मोरे (६० उमरगा), बालाजी नागनाथ चव्हाण (५०), उमाबाई बालाजी चव्हाण (४५ दोघी रा़मुळज), सविता विश्वनाथ जाधव (४५ रा़ उजळंब ता़बसवकल्याण) हे २२ प्रवाशी जखमी झाले़ तर मोतीराम पवार, क्रिश जाधव, निकिता जाधव, प्रमोद जाधव, विठूबाई बनसोडे व ओंकार सूर्यवंशी हे सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़