डीसीसी उपाध्यक्षपदी पृथ्वीराज सिरसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 23:43 IST2017-03-30T23:40:44+5:302017-03-30T23:43:20+5:30
ल्ाातूर : जिल्हा बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी पृथ्वीराज सिरसाट यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

डीसीसी उपाध्यक्षपदी पृथ्वीराज सिरसाट
ल्ाातूर : जिल्हा बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी पृथ्वीराज सिरसाट यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक बी.एल. वांगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. व्हाईस चेअरमनपदासाठी पृथ्वीराज सिरसाट यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन व्हाईस चेअरमन चंद्रशेखर भोसले यांच्या निधनामुळे पद रिक्त होते.
यावेळी आमदार दिलीपराव देशमुख, चेअरमन अॅड. श्रीपतराव काकडे, संचालक एस.आर. देशमुख, बाबासाहेब पाटील, अशोकराव पाटील निलंगेकर, नाथसिंह देशमुख, भगवानराव पाटील, संभाजी सूळ, सुधाकर रुकमे उपस्थित होते.