कैद्यांना मिळाला रोजगार...!
By Admin | Updated: February 13, 2016 23:58 IST2016-02-13T23:58:47+5:302016-02-13T23:58:47+5:30
जालना : कैद्यांना रोजगार व शिक्षेनंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून झाडू व खराटा तयार करण्याचा प्रकल्प जिल्हा कारागृह व योगेश्वरी बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे.

कैद्यांना मिळाला रोजगार...!
जालना : कैद्यांना रोजगार व शिक्षेनंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून झाडू व खराटा तयार करण्याचा प्रकल्प जिल्हा कारागृह व योगेश्वरी बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी कारागृह औरंगाबाद विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारागृह अधिक्षक बी. एस. खराटे, कांबळे, संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर मुंडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कैद्यांना मार्गदर्शन करताना उपमहानिरीक्षक धामणे म्हणाले, कायद्याने शिक्षा दिलेल्या कैद्यांना शिक्षेनंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यांनी सुधारणा करून नव्याने जीवन जगण्यासाठी येथे झाडू- व खराटा तयार करण्याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचा शिक्षा झालेल्या कैद्यांबरोबरोबच जे विविध गुन्ह्यांतील कच्चे कैदी त्याचा लाभ घेतील. येथून बाहेर पडल्यानंतर आपल्या घरीच हा झाडू -खराटा तयार करण्याचा लघुउद्योग सुरू करून समाजात ताठ मानेने जगावे, असे आवाहन केले. यावेळी कारागृह अधीक्षक खराटे म्हणाले की, झाडू- खराटा तयार करण्याच्या या प्रकल्पामुळे कैद्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. तसेच कारागृहात कैद्यांना रोजगारांसाठी लाँड्री व्यवसाय ही सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह बाहेरील खाजगी व्यक्तीही आपले कपडे या लाँड्रीत कपडे देऊ शकतात. असेही खराटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)