कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: November 9, 2016 01:28 IST2016-11-09T01:27:06+5:302016-11-09T01:28:01+5:30
बीड : येथील जिल्हा कारागृहात एका गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या कैद्याने मंगळवारी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
बीड : येथील जिल्हा कारागृहात एका गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या कैद्याने मंगळवारी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
भाऊसाहेब मोहन साबळे (रा. केरुर, ता.आष्टी) असे त्या कद्याचे नाव आहे. तो बरॅक क्र. ६ मध्ये बंदिस्त होता. त्याने फिनेल हे विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जिल्हा कारागृहात कैद्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. विषारी द्रव कारागृहात पोहचले कसे? याबद्दल अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले. (प्रतिनिधी)