शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

हर्सूल कारागृहात वॉर्डनकडून कैद्याला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:11 PM

या मारहाणीनंतर कैद्याची प्रकृती बिघडताच त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ठळक मुद्देआपसातील वादाचे पर्यवसन झाले मारहाणीतजखमी कैद्याला मध्यरात्रीनंतर केले घाटी रुग्णालयात दाखल

औरंगाबाद : खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला अन्य दोन कैद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना हर्सूल मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी रात्री घडली. या मारहाणीनंतर कैद्याची प्रकृती बिघडताच त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अविनाश शंकर पिंगळे आणि गणेश बागूल अशी मारहाण करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत, तर राजू भाऊसाहेब कुटे असे जखमी कैद्याचे नाव आहे. हर्सूल पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील राजू कुटे हा आरोपी आहे. तो हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे, तर राजूला ज्या बराकीमध्ये ठेवण्यात आले आहे त्या बराकीचा वॉर्डन म्हणून कैदी अविनाश पिंगळे हा काम पाहतो. त्याच बराकीमध्ये राजू सोबत गणेश बागूल हा कैदी राहतो.

गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बराकीतील फरशी स्वच्छ करण्याचा कपडा राजूने घेतला होता. हा कपडा कोण स्वच्छ करीन, असे म्हणून गणेशने राजूसोबत वाद घातला आणि त्यास मारहाण केली. त्यावेळी तेथे असलेल्या वॉर्डन अविनाशनेही गणेशची बाजू घेत राजूला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वादावादी होऊन गणेश आणि अविनाश यांनी राजूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अन्य कैद्यांनी आणि जेल रक्षकांनी मध्यस्थी करून अविनाश आणि गणेशच्या तावडीतून राजूची सुटका केली. त्यानंतर सुमारे चार ते पाच तासांनंतर राजूला पोट दुखण्याचा त्रास होऊ लागला.

याविषयी राजूने तक्रार करताच त्याला कारागृहातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी राजूवर प्रथमोपचार केले. त्यानंतर तासाभराने राजूने पुन्हा असह्य त्रास होत असल्याची तक्रार करताच कारागृह रक्षकांनी राजूला रात्री पावणेतीन वाजता घाटीत दाखल केले. राजूवर घाटीत उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोहेकॉ. दादाराव कोतकर यांनी कैदी राजू याचा जबाब नोंदवला.

कारागृह प्रशासनाने कळविले पोलिसांनाया घटनेविषयी बोलताना कारागृह अधीक्षक बी.आर. मोरे म्हणाले की, रात्री कैदी राजू आणि वॉर्डन पिंगळे यांच्यात हाणामारी झाली. पिंगळेने मारहाण केल्याची तक्रार राजूने करताच या घटनेची माहिती आम्ही हर्सूल पोलिसांना कळविली. राजूवर प्रथम कारागृहातील डॉक्टरांमार्फत उपचार करून नंतर घाटीत नेले.

टॅग्स :Prisonतुरुंगgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीPoliceपोलिसjailतुरुंग