शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा गुन्हेगारीची निवड;चांगल्या वर्तवणूकीमुळे खुल्या कारागृहात ठेवलेला कैदी २३ दिवसांत पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:52 IST

पैठणच्या खुल्या कारागृहातून जन्म ठेप भोगणाऱ्या कैद्याचे पलायन

पैठण ( औरंगाबाद ) :  मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद येथून २३ दिवसापूर्वी पैठण येथील खुल्या कारागृहात वर्ग झालेल्या कैद्याने रविवारी सायंकाळी कारागृह प्रशासनाची  नजर चुकवून पलायन केले आहे. कारागृह प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून पलायन केलेल्या कैद्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कैद्याचा शोध घेण्यात येत आहे. 

जन्म ठेपेची शिक्षा झालेला  (कैदी क्र. सी ५३४८) अशोक दत्ताराव बोंगाणे (रा. परभणी) हा त्याचा बँरेक क्र ९ मध्ये सायंकाळी आढळून न आल्याने कारागृहातील शिपायांनी त्याचा परिसरात शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. सोमवारी कारागृहाचे शिपाई   साहेबराव लक्ष्मण फुसे यांनी पैठण पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ज्या कैद्याची वर्तनूक चांगली असते अशा कैद्यांना शिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात पैठण येथील खुल्या कारागृहात हलविले जाते. येथील तुरूंगांना भिंती नसतात. 

परभणी येथील कैदी अशोक बोंगाने यास २०१४ मध्ये परभणी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान त्याची वर्तणूक चांगली असल्याने त्यास पैठण येथील कारागृहात राहण्याची सवलत देण्यात आली होती. परंतु अवघ्या २३ दिवसात त्याने पैठण कारागृहातून धूम ठोकली. कारागृह प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ राजू आटोळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग