प्राचार्य उल्हास शिंदे यांची कार्यकारी परिषदेवर फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:04 IST2020-12-24T04:04:36+5:302020-12-24T04:04:36+5:30

यापूर्वी डॉ. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विधिसभा सदस्य, अध्यक्ष अभ्यास मंडळ, अधिष्ठाता अभियांत्रिकी विद्याशाखा या ...

Principal Ulhas Shinde re-elected to the Executive Council | प्राचार्य उल्हास शिंदे यांची कार्यकारी परिषदेवर फेरनिवड

प्राचार्य उल्हास शिंदे यांची कार्यकारी परिषदेवर फेरनिवड

यापूर्वी डॉ. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विधिसभा सदस्य, अध्यक्ष अभ्यास मंडळ, अधिष्ठाता अभियांत्रिकी विद्याशाखा या पदांवर काम केले. तर इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एजुकेशन, न्यू. दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य तसेच कॉम्पुटर सोसायटी ऑफ इंडिया, औरंगाबाद चॅप्टरचे अध्यक्ष आहेत. डॉ. शिंदे यांच्या फेरनिवडीबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर मुळे, अध्यक्ष रणजित मुळे, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय व रुग्णालयचे प्राचार्य डॉ. एस. सी. भोयर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी. बी. डोंगरे तसेच छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

---

फोटो ओळः प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांचा सत्कार करताना छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर मुळे.

Web Title: Principal Ulhas Shinde re-elected to the Executive Council