पंतप्रधान म्हणाले, कुठून आलात ?

By Admin | Updated: July 16, 2014 00:48 IST2014-07-16T00:39:20+5:302014-07-16T00:48:28+5:30

नांदेड: दिल्लीला विमानाने जाऊ़़़ इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहू़़़ संसद भवनात पंतप्रधानांशी संवाद साधू़़़ हा विचार कधी माझ्या स्वप्नातही आला नव्हता़

The Prime Minister said, Where did you come from? | पंतप्रधान म्हणाले, कुठून आलात ?

पंतप्रधान म्हणाले, कुठून आलात ?

नांदेड: दिल्लीला विमानाने जाऊ़़़ इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहू़़़ संसद भवनात पंतप्रधानांशी संवाद साधू़़़ हा विचार कधी माझ्या स्वप्नातही आला नव्हता़ लोकमत मधून वाचलेलं, टीव्हीवरून पाहिलेलं हे सारे अद्भूत जग आपण प्रत्यक्ष अनुभवू असेही कधी वाटले नाही़ पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वेगळे आकर्षण होते़ ते कसे दिसतात, कसे बोलतात हे त्यांच्याशी प्रत्यक्ष समारोसमोर बोलण्यातून कळाले़ हा योग लोकमतमुळे जुळून आला़ दिल्लीतील संसद भवनात त्यांनी पहिला प्रश्न कुठुन आलात? असे मराठीतून विचारला़ त्यानंतरही मराठीतूनच कसे आहात, नाव काय, मोठे झाल्यावर काय होणार, असे प्रश्न विचारून आमच्याशी आपुलकीने संवाद साधला़ हा क्षण माझ्या मनावर कायमचा कोरला गेल्याची भावना नांदेडच्या केंब्रीज विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अंजली प्रमोदराव रावके हिने लोकमतकडे व्यक्त केल्या़
लोेकमत संस्काराचे मोती या स्पर्धेत अंजली रावके हिच्यासह राज्यभरातील विजेत्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्याचा उपक्रम लोकमतने राबविला़ त्यांच्या भेटीने भारावलेल्या या विद्यार्थ्यांनी हवाई सफरीसोबतच राजधानी दिल्लीतील महत्वपूर्ण ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली़
मोदी म्हणाले,
देशाची सेवा करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अमूल्य वेळ काढून आमच्याशी चर्चा केली़ त्यांनी आम्हाला खूप शिका, अभ्यास करा व मोठ्या पदावर पोहोचून देशाची सेवा करा, असा संदेश दिला़
लोकमतने मिळवून
दिली संधी
अंजलीचे वडील प्रमोदराव रावके म्हणाले, सुरूवातीपासूनच अंजली लोकमतच्या विविध स्पर्धात सहभागी होत आहे़ यावेळी संस्काराचे मोती स्पर्धेनने तिला हवाई सफरीची संधी मिळवून दिली़ पंतप्रधानाशी बोलण्याची संधी मिळाली़ ती घरी परतल्यापासून आतापर्यंत दिल्ली, विमान प्रवास यांचेच वर्णन सुरू आहे़ तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लोकमतनेच दिला़ दिल्ली सफरीच्या एक दिवसीय सहलीने अंजलीच्या मनात वेगळा आत्मविश्वास आल्याचे पाहण्यास मिळत आहे़ दिल्लीहून आल्यापासून तिच्या मैत्रिणी प्रवास वर्णनाविषयी सारख्या विचारत आहेत़
इंडियागेट आवडले
मुंबई ते दिल्ली या दोन तासाच्या विमानप्रवासानंतर आम्ही सर्वजन विमानतळावर उतरलो़ लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र बसमधून संसद भवनात नेले़ त्यानंतर राष्ट्रपती भवन, इंडिया गेट आम्हाला पाहण्यास मिळाले़ भव्य इमारती, मोठे मैदान व त्यातील शाही गार्डनने मन प्रसन्न झाले़ तर दुपारच्या भोजनानेही आम्ही सर्व तृप्त झालोत़
विमानात चढताना
झाला आनंद
अंजली म्हणाली, स्वप्नवत हवाई सफरीने दिल्ली गाठून चक्क देशाच्या प्रधानमंत्र्यांशी बोलण्याच्या कल्पनेनेच मी आनंदी झाले होते़ नांदेडहून मुंबई गाठल्यानंतर तेथून आम्हाला विमानाने दिल्लीला नेण्यात आले़ पहिल्यांदाच विमानात चढताना मनात थोडी भिती व आनंदही होता़ वडिलांनी मुंबई इथपर्यंत येवून सोडल्यानंतर लोकमतच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता मुंबई विमानतळावर घेवून गेले़ त्याच रात्री आम्ही दिल्लीहून मुंबईला आलो़ त्यानंतर लोकमतने आमच्या राहण्याची व्यवस्था केली़

Web Title: The Prime Minister said, Where did you come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.