मांस प्रकरणातील मुख्य आरोपी शासन समितीवर

By Admin | Updated: August 23, 2015 23:48 IST2015-08-23T23:26:16+5:302015-08-23T23:48:20+5:30

बीड : शहराजवळील रामनगर येथील साई कोल्ड स्टोअरेजमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी पकडलेल्या मांस प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हाधिकाऱ्यांच्या

The prime accused in the flesh case is on the Government Committee | मांस प्रकरणातील मुख्य आरोपी शासन समितीवर

मांस प्रकरणातील मुख्य आरोपी शासन समितीवर


बीड : शहराजवळील रामनगर येथील साई कोल्ड स्टोअरेजमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी पकडलेल्या मांस प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा या समितीचा अशासकीय सदस्य असल्याची धक्कादायक माहिती रविवारी पुढे आली. दरम्यान, या कोल्ड स्टोअरेजमधील मांस विक्रीसाठी चेन्नईला जात होते, असेही निष्पन्न झाले.
देवदत्त गोविंद चौरे यांच्या मालकीचे हे स्टोअरेज असून, शाहेद जावेद कुरेशी (रा. मोमीनपुरा, बीड) याच्या साथीने हा व्यवसाय राजरोस सुरू होता. मुख्य आरोपींमधील शाहेद जावेद कुरेशी हा जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नेमण्यात आला होता. प्राण्यांच्या रक्षणाऐवजी तो वेगळ्याच मार्गाला लागला. त्यामुळे शाहेद कुरेशी याला प्रशासनाने कुठल्या निकषावर सदस्यपद बहाल केले ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याला कुणाची शिफारस होती ? हे अद्याप समोर आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच त्याने सदस्यपद पदरात पाडून कवच मिळविले होते.
आरोपी कोठडीत
या प्रकरणात चौरे, कुरेशी यांच्यासह ४७ परप्रांतीय कामगारांना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. सोमवारी कोठडीची मुदत संपत असून, मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The prime accused in the flesh case is on the Government Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.