जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST2021-03-09T04:06:02+5:302021-03-09T04:06:02+5:30
जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ९ महिला बीट अंमलदार यांना सोमवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात ...

जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा गौरव
जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ९ महिला बीट अंमलदार यांना सोमवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. पोलीस मुख्यालयाच्या गोकुळ मैदानावर जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी मास्क व सॅनिटायझर वापरासह सर्व परिसर हा स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बीट महिला अंमलदार यांना मार्गदर्शन करताना त्यांनी, कोणतेही काम करताना अडचणींना समोरे जावे लागते. आयुष्य हे रोज शिकण्याचे आहे. रोज नवीन गोष्ट अनुभवायची आहे. आपले काम नक्की काय आहे व स्वत:ला काय करायचे याची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केलेल्या चांगल्या कामातून मिळणारे समाधान सुखद अनुभूती असते. नोकरीच्या ठिकाणी कौटुंबिक अडचणी, समस्या यांना दूर ठेवून पुढे जावे लागते. यासाठी सर्वांनी सशक्त होणे गरजेचे असल्याबाबत मत व्यक्त केले आहे.
प्रभारी पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक, भगिरथ देशमुख, पो. नि. संजय निर्मळ, राखीव पो. नि. गणेश सुरवसे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. नीलम सतीश सोळुंके-जाधव पोलीस उपनिरीक्षक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले