अंतापुरात प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST2020-12-24T04:06:06+5:302020-12-24T04:06:06+5:30
गल्लेबोरगाव : कृषीविज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक शेतकरी दिनाचे औचित्य साधून कन्नड तालुक्यातील अंतापूर गावात ‘पीक परिसंवाद’ घेण्यात आला. यावेळी ...

अंतापुरात प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव
गल्लेबोरगाव : कृषीविज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक शेतकरी दिनाचे औचित्य साधून कन्नड तालुक्यातील अंतापूर गावात ‘पीक परिसंवाद’ घेण्यात आला. यावेळी कृषीविज्ञान केंद्र औरंगाबादचे डॉ. किशोर झाडे यांनी मार्गदर्शन केले. ऊसलागवड व त्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
फर्टीलायजरचे पुरवठा व विपणन प्रमुख मिलिंद आकेरकर यांनीही शेतकऱ्यांना खतांच्या उपलब्धतेबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. पिसुरे यांनी राष्ट्रीय किसान दिवसाचे महत्त्व तसेच कृषीविज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधांबद्दल माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी प्रमोद चव्हाण यांनी पोखरा योजनेचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांना झुआरी एग्रो एजन्सीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विलास सुराशे, सुदाम बोडखे, विश्वास आहेर, बाळासाहेब आहेर, मुक्तेश्वर बोडखे, संजय बोडखे, सुनील बोडखे, सचिन बोडखे, कृषी सहाय्यक ज्योती पवार, वैशाली घुमरे, बाबासाहेब चंद्रटीके, देवीदास सुरासे, विठ्ठल दांगोडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ठाकरे व विलास सुरासे यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन : शेतकरी दिनानिमित्त अंतापूर येथील शेतकऱ्यांना कृषीविज्ञान केंद्र औरंगाबादच्या वतीने मार्गदर्शन करताना डाॅ. किशोर झाडे, मिलिंद आकेकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रमोद चव्हाण.