विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव
By Admin | Updated: August 18, 2014 00:31 IST2014-08-18T00:11:37+5:302014-08-18T00:31:55+5:30
हिंगोली : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव
हिंगोली : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ओंकार प्रिंटर्सच्या मंजुषा घवाड यांना प्रथम पुरस्कार १५ हजार तर राधीका स्टील इंडस्ट्रीजचे श्यामसुंदर मुंदडा यांना १० हजार रूपयांचा द्वितीय पुरस्कार मिळाला.
शिक्षण विभाग- पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकाबद्दल प्रणिता पारसकर आणि साक्षी पारसकर यांना गौरविण्यात आले.
समाज कल्याण विभाग- छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवंत पुरस्कार योजनेंतर्गत आशा खंदारे हिला १० हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालय- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार राकेश भट्ट यांना प्रथम पुरस्कारात ५ हजार, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. यावेळी भट्ट यांनी पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना देण्याची घोषणा केली. ग्रामीण विकास विभाग- यशवंतराव पंचायत राज अभियान विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्काराने पं.स. सभापती छगनराव बनसोडे, उपसभापती विनोद नाईक व गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड यांना गौरविण्यात आले.
आरोग्य विभाग- संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रवृत्त करणाऱ्यांत प्रथम रंजना सरोदे, द्वितीय मुक्ता खुडे आणि तृतीय सुजाता धुळधुळे यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्हाने गौरविण्यात आले.
उपकेंद्र स्तरावर- के.जी. सोनुने, एस.डी. सुरोशे आणि आय.आर. बांगर यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.
आरोग्य केंद्र - आखाडा बाळापूर, सिरसम बु. आणि कुरूंदा केंद्राने अनुक्रंमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी बाजी मारली. ग्रामीण केंद्रांमध्ये औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाने बाजी मारली. सूत्रसंचालन प्रा.मदन मार्डीकर यांनी केले. (प्रतिनिधी)