भूईमुगास ३४४५ रूपयांचा भाव
By Admin | Updated: May 22, 2014 00:35 IST2014-05-22T00:16:57+5:302014-05-22T00:35:28+5:30
हिंगोली : आर्थिक चणचणीपायी काढणी होताच उत्पादकांनी भूईमुगास बाजार दाखविण्यास सुरूवात केली आहे. परिणामी हिंगोली बाजार समितीत दिवसेंदिवस भूईमुगाची आवक वाढत आहे;
भूईमुगास ३४४५ रूपयांचा भाव
हिंगोली : आर्थिक चणचणीपायी काढणी होताच उत्पादकांनी भूईमुगास बाजार दाखविण्यास सुरूवात केली आहे. परिणामी हिंगोली बाजार समितीत दिवसेंदिवस भूईमुगाची आवक वाढत आहे; परंतु भाव स्थिर राहत असल्यामुळे बुधवारी उत्पादकांना क्विंटलामागे ३ हजार ४४५ रूपयांचा कमाल भाव मिळाला. जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पाण्याचे सर्व स्त्रोत पूर्णत: भरल्याने उन्हाळी पिकांची हमी उत्पादकांना होती. रबी हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने हातचे पीक निघून गेले होते. दोन्ही हंगाम निघून गेल्यामुळे खताबियाण्या इतका पैसा भूईमुगाच्या पिकातून वसूल करण्याचा उत्पादकांचा बेत होता. पाण्याची कमतरता यंदा भासणार नसल्याने गतवर्षीपेक्षा यंदा भूईमुगाचा पेरा अधिक झाला होता. दरम्यान, शेतकर्यांनी खते, फवारणी, निंदणी करून भूईमुगाची निगा राखली होती; परंतु पावसाचा धडाका उन्हाळ्यातही सुरूच राहिला. पीक जोमात असताना दोन-तीन वेळा पावसाने हजेरी लावली. पावसामुळे आभाळ आल्याने भूईमुगावर अळीचा प्रादुर्भाव झाला. त्याचा परिणाम पीक वाढीवर आणि उत्पन्नावर पहावयास मिळाला. आता काढणी झाल्यानंतर भूईमुगाला येत असलेल्या उतार्यातून त्याची प्रचिती उत्पादकांना आली. मागील वर्षी पाण्याची कमतरता भासूनही एका बॅगला १० ते १२ पोत्यांचा उतारा आला होता. यंदा उत्पादन खर्च आणि पाण्याचा मूबलक पुरवठा करूनही २ ते ४ पोत्यांनी भूईमुगाचा उतारा घटला. एकीकडे अधिक खर्च करूनही उत्पादनात वाढ झाली नसल्यामुळे उत्पादकांची निराशा झाली. बहुताश उत्पादकांना भूईमुगाच्या पिकावर खरीप हंगामातील बियाण्याची खरेदीची मदार होती. भूईमुगाच्या विक्रीतून खत, बियाणे खरेदी करण्याचा बेत आखला होता; परंतु अपेक्षित उत्पादनाअभावी शेतकर्यांची साफ निराशा झाली. त्यातच भूईमुगाला बाजारात म्हणावा तशा भावही मिळत नाही. काढणी होताच उत्पादांनी भूईमुगाला बाजार दाखविण्यास सुरूवात केल्याने हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यात भूईमुगाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु भाव मात्र स्थिर असल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशा पडत आहे. बुधवारी सकाळी ३ हजार ११५ रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार अपेक्षित वाढ न होता ३ हजार ४४५ रूपयांपर्यंत कमाल दर गेला. मागील पंधरवाड्यापासून भूईमुगाची खरेदीस सुरूवात झाली असताना भावात वाढ होताना दिसत नाही. (प्रतिनिधी) जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पातळीत वाढ झाल्याने पाण्याची कमतरता भासणार नसल्याने यंदा भूईमुगाचा पेरा झाला होता अधिक. मागील वर्षी खरीप आणि रबी हंगाम हातचा निघून गेल्यामुळे खताबियाण्यासाठी लागणारा पैसा भूईमुगाच्या पिकातून वसूल करण्याचा होता जिल्ह्यातील उत्पादकांचा होता बेत. शेतकर्यांनी खते, फवारणी, निंदणी करून भूईमुगाची निगा राखली होती; परंतु उन्हाळ्यातही सुरूच राहिला पावसाचा धडाका . पीक जोमात असताना दोन-तीन वेळा पावसाने हजेरी लावली तसेच आभाळ आल्याने भूईमुगावर झाला होता अळीचा प्रादूर्भाव. पावसामुळे पीक वाढीवर आणि उत्पन्नावर परिणाम पहावयास मिळाल्याने आता पीक काढणी झाल्यानंतर येत आहे उतार्यात घट. बुधवारी सकाळी ३ हजार ११५ रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. दरम्यान भूईमुगाच्या दर्जानुसार अपेक्षित वाढ न होता ३ हजार ४४५ रूपयांपर्यंत स्थिरावला कमाल दर.