शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

औरंगाबादेत बाजरीस उच्चांकी २४७५ रुपये प्रती क्विंटलचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:29 IST

आवक घटल्याने  बाजरीने मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आज झालेल्या लिलावात बाजरीला उच्चांकी भाव मिळाला. खाडेगाव (कचनेर ) येथील शेतकरी भरत हुल्सार यांच्या बाजरीची २४७५ रु प्रती क्विंटल अशा भावाने खरेदी करण्यात आली. 

आवक घटल्याने  बाजरीने मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे. जाधववाडी येथे मागील आठवड्यात परराज्यातील बाजरीला विक्रमी भाव मिळाला होता. विशेषत: उत्तर प्रदेश व राजस्थानमधून येणाऱ्या बाजरीला २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. हा भाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा जास्त आहे. आज या उच्चांकी भावालासुद्धा मात देत स्थानिक बाजरीने २४७५ रुपयांचा पल्ला गाठला आहे. 

आजवरचा सर्वात जास्त भाव भरत हुल्सार यांनी त्यांच्या एक एकर शेतीत बाजरी लावली होती. यातून त्यांना २१ गोण्या इतके बाजरीचे उत्पादन मिळाले. बाजरीला कमी पाणी लागत असल्याने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्येही बाजरीचे उत्पादन चागंले आहे. बाजरीस मिळालेला हा भाव आजवरचा सर्वात जास्त असल्याचे हुल्सार यांनी सांगितले. 

स्थानिक बाजरीला मागणी पावसाने ओढ दिल्याने बाजरीची वाढ खुंटली, तसेच राज्यात अनेक भागांत पिके जळाली. काही ठिकाणी बाजरीवर बुरशीअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात ४० ते ६० टक्क्यापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे. औरंगाबादेत उत्तर प्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होते, मात्र ही बाजरी बारीक व कमी प्रमाणात हिरवी असते, या उलट स्थानिक बाजरी मोठी व हिरवी असते यामुळे या बाजरीला मागणी असते अशी माहिती जाधववाडीतील व्यापारी गजानन बाळकृष्ण यांनी दिली. 

हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला  पूर्वी बाजरी ही गरिबांची समजली जायची. आता विशेषत: हिवाळ्यात गव्हापेक्षा बाजरी व ज्वारी खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे आता केंद्र सरकारने ज्वारी व बाजरीचा पोषक तृणधान्यामध्ये समावेश केला आहे, तसेच ज्वारीच्या हमीभावात ७३० रुपयांनी वाढ करून २४५० रुपये, तर बाजरीच्या हमीभावात ५२५ वाढ करून १९५० रुपये प्रतिक्विंटल केला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड