मुलींचे गळतीचे प्रमाण रोखणार
By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-06T23:59:11+5:302014-10-07T00:14:33+5:30
जालना : शिक्षणातील मुलीची गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागत विविध माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे मत

मुलींचे गळतीचे प्रमाण रोखणार
जालना : शिक्षणातील मुलीची गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागत विविध माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे मत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील यांनी व्यक्त केले.
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शुक्रवारी इंदेवाडी येथील कस्तुरबा गांधी विद्यालय येथ मुलींच्या आरोग्य विषयक दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूणे विस्तार अधिकारी रवि जोशी प्रा बाबासाहेब जुंबड यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना पाटील यांनी मुलीच्या सर्वागीन विकास करण्यासाठी मुलीचे शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे . त्यासाठी मानसिक वाढ होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
त्यासाठी प्राथमिक विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात मुलींचे शिक्षणात गळतीेचे प्रमाण कमी करण्यासाठी सी.ई.ओ. प्रेरणा देशभ्रतार यांनी ग्रामीण भागात अनेक कार्यशाळा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकवर्गाला आपल्या मुलींना दररोज शाळेत पाठविण्याचे आवाहन करत आहोत. मुलीं मध्ये जनजागृती करण्यासाठी आणि गैरसमजूती दूर करण्यासाठी शिक्षण विभागतर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनीची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्त विद्यार्थीनीना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी रमेश पाटील, प्रा. सुहास सदाव्रते आदीची उपस्थिती होती. या कार्यशाळेत मान्यवरांनी विविध विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार मते मांडली. तसेच या योजनेतील यश-अपयश यासंदर्भातील चर्चा केली व योजना अधिकाधिक यशस्वी व्हावी म्हणून सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत, असे म्हटले. (प्रतिनिधी)