शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

भाजपला रोखण्यासाठी बसपा समविचारी पक्षांसोबत जाणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:35 PM

आगामी निवडणुकीत भाजपचा रथ रोखण्यासाठी बसपा समविचारी पक्षांसोबत जाणार असून, त्याप्रमाणे देशभर वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील मागासवर्गीय नेत्यांनी बसपाच्या हत्तीची सवारी करावी, आम्ही त्यांच्यासोबत नव्हे तर त्यांनीच आमच्या सोबत यावे

औरंगाबाद : आगामी निवडणुकीत भाजपचा रथ रोखण्यासाठी बसपा समविचारी पक्षांसोबत जाणार असून, त्याप्रमाणे देशभर वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. मराठवाडा विभागाच्या बैठकीनिमित्त आलेले राष्ट्रीय उपाध्यक्ष जयप्रकाशसिंग यांनी मंगळवारी सुभेदारी येथे पत्रकारांना माहिती दिली.

बसपाने पक्षाच्या घटनेत राष्ट्रीय स्तरावर बदल केल्यानंतर सोशल इंजिनिअरिंग, झोननुसार तसेच गावपातळीवर देखील जनजागृती सुरू केली आहे. भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून देशातील लोकशाहीला खो देत  हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मशीनमधील गोंधळास रोखण्यासाठी बसपा प्रयत्नशील असून, न्यायालयात हा वाद नेला आहे. मशीन आॅपरेट न करता मशीनमधील गोंधळ स्पष्ट करावा, असा भाजपचा कांगावा आहे. तज्ज्ञ विदेशातून  बोलवून मशीनमधील गडबड समोर आणण्याची विनंती  बसपाने कोर्टास केली आहे, असेही जयप्रकाशसिंग म्हणाले. २०१९ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने बसपाने तयारी सुरू केली असून, समविचारी पक्ष आमच्यासोबत येत आहे. कर्नाटक निवडणुकीत बसपाचा एक उमेदवार निवडून आला. 

मागासवर्गीय नेत्यांनी बसपा सोबत यावे

महाराष्ट्रातील मागासवर्गीय नेत्यांनी बसपाच्या हत्तीची सवारी करावी, आम्ही त्यांच्यासोबत नव्हे तर त्यांनीच आमच्या सोबत यावे, असे राष्ट्रीय कोआॅर्डिनेटर खा. वीरसिंग यांनी सांगितले. सपा, काँग्रेस, तसेच समविचारी पक्षाला सोबत घेऊन भाजपची नाकाबंदी करण्यावर पक्षाचा जोर आहे. जनताही चार वर्षांतच भाजपच्या नाकर्तेपणाला कंटाळली असून, ईव्हीएम मशीन जनताच मतदान केंद्रातून बाहेर फेकतील अशी अवस्था निर्माण झाली आहे, असे राज्याचे प्रभारी डॉ. खा. अशोक सिद्धार्थ म्हणाले. 

यावेळी पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, महाराष्ट्र प्रभारी ना. तु. खंदारे, कोषाध्यक्ष नदीमभाई चौधरी, जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे, किशोर म्हस्के आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPoliticsराजकारणElectionनिवडणूक