अवैध वाळू वाहतूक पोलीस यंत्रणेच्या पर्थ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:21+5:302020-12-17T04:26:21+5:30

फुलंब्री : तालुक्यात वाळूची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून याकडे पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष आहे. या अवैध व्यवसायाला जबाबदार ...

On the pretext of illegal sand traffic police system | अवैध वाळू वाहतूक पोलीस यंत्रणेच्या पर्थ्यावर

अवैध वाळू वाहतूक पोलीस यंत्रणेच्या पर्थ्यावर

फुलंब्री : तालुक्यात वाळूची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून याकडे पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष आहे. या अवैध व्यवसायाला जबाबदार यंत्रणेकडून अभय मिळत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असल्याची स्थिती फुलंब्री तालुक्यात आहे. हप्ताखोरीने पोलीस यंत्रणा बरबटली असल्याचे चित्र असून याबाबत नुकतीच पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आलेली आहे.

फुलंब्री तालुक्यात फुलंब्री व वडोद बाजार ही दोन पोलीस स्टेशन आहेत. यात वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाबरा, निमखेडा, बोरगाव अर्ज, गव्हाळी, तांडाबाजार, वडोद बाजार, वाकोद या ठिकाणी असलेल्या नदीच्या पात्रातून सर्रासपणे दररोज शेकडो ब्रॉस वाळूची अवैधरीत्या तस्करी केली जाते. यासह फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीत वाणेगाव, पिंपळगाव वळण, म्हसला, कान्होरी, पाल, लहानेवाडी या गिरिजा नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने वाळूची चोरी होत असल्याची स्थिती आहे. मात्र, सर्वकाही माहिती असतानासुद्धा महसूल विभागासह पोलीस यंत्रणा याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

-----

लॉकडाऊनमुळे भाव वाढला

लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प होते. मात्र, अवैधरीत्या चालणाऱ्या व्यवसायाचे भाव मात्र वाढलेले असल्याचे चित्र हाेते. यात वाळूच्या दरात मोठ्या प्रामणात वाढ झाली असून दररोज शेकडो ब्रॉस वाळूची अवैध वाहतूक होत आहे. जिल्ह्यातील कुठल्याच वाळू पट्याचा लिलाव झाला नसताना शहरासह इतर ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वाळू येते कुठून, असा प्रश्न आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाला पोलीस यंत्रणेकडून पाठबळ मिळत असल्याची तक्रारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

Web Title: On the pretext of illegal sand traffic police system