शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला दाखविण्यासाठी टॅक्सी चालवण्याचे नाटक; प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे चोरायचा मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:38 IST

विद्यार्थ्यांच्या घरातून मोबाइल चोरणारा अटकेत; ११ मोबाइलसह १ दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण, भाडेतत्त्वावर एकत्र राहणाऱ्या तरुणांचे घर, खोल्यांमध्ये घुसून मोबाइल चोरणारा कुख्यात गुन्हेगार शेख माजिद शेख गफ्फर (३६) याला सिडको पोलिसांनी अटक केली. त्याने विकलेले ११ माेबाइल आणि १ दुचाकीही जप्त केली.

सिडको, उस्मानपुरा, क्रांतीचौक, समर्थनगर भागात सातत्याने सकाळी मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. व्यायाम, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे, पोलिस भरती, स्टडी रूम व कंपनीला जाणारे बहुतांश तरुण मित्रांसोबत भाडेतत्त्वावर खोली करून राहतात. एखादा साथीदार सकाळीच बाहेर पडल्यानंतर दरवाजा उघडा राहतो. माजिदने हीच बाब हेरत सकाळी अशा खोल्यांमधून मोबाइल चोरी सुरू केली. शनिवारी पिसादेवी रोडवर दोन मोबाइल चोरल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. उपनिरीक्षक प्रमोद देवकाते यांनी त्याची कसून चौकशी केली. त्याने बीडला विकलेले ११ मोबाइल व फिरण्यासाठी चोरलेली दुचाकी जप्त केली. अंमलदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, सहदेव साबळे, विशाल सोनवणे यांनी ही कारवाई केली.

माजिद चोरलेले बहुतांश मोबाइल बीडला नेऊन विकतो. यापूर्वी त्याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली होती. पूर्वी तो बीडवरून शहरात चोरी करण्यासाठी येत होता. चार महिन्यांपूर्वीच तो शहरात स्थायिक झाला. चोरीचे मोबाइल विकत घेतलेल्या शॉपी चालकाला मात्र पोलिसांनी अटक केली नाही.

सकाळी चोऱ्या; दिवसा टॅक्सी चालवायचामाजिदच्या सततच्या गुन्ह्यांमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. गुन्हेगारी सोडून त्याने पत्नीला टॅक्सी चालवून कमाईचे आश्वासन दिल्यानंतर पत्नी त्याच्यासोबत हिनानगरमध्ये स्थायिक झाली. सकाळी छत्रपती संभाजीनगर जालना मार्गावर टॅक्सी चालवण्याचे कारण सांगून तो घराबाहेर पडायचा. सकाळी ६ ते ८ या वेळेत घरातून मोबाइल चोरून पुन्हा टॅक्सीच्या कामावर रुजू होत होता. शनिवारी मात्र तो रंगेहाथ हाती लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलAurangabadऔरंगाबाद