लोहगडावर पाच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:05 IST2021-08-13T04:05:27+5:302021-08-13T04:05:27+5:30

फुलंब्री : तालुक्यातील लोहगड नांद्रा येथील लोहगडावर पाच देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. यावेळी शेकडो भाविक ...

The prestige of five idols on Lohgad in excitement | लोहगडावर पाच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उत्साहात

लोहगडावर पाच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उत्साहात

फुलंब्री : तालुक्यातील लोहगड नांद्रा येथील लोहगडावर पाच देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. विविध धार्मिक कार्यक्रमाने लोहगडाचा परिसर निनादून गेला होता.

ऐतिहासिक वास्तू अशी ओळख असलेला लोहगड धार्मिक स्थळ म्हणूनदेखील उदयास आले आहे. येथील रामेश्वर मंदिराच्या परिसरात प्रभू रामचंद्र-सीता माता, लक्ष्मण, वाल्मीक ऋषी व हनुमान या देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ह.भ.प. दादा महाराज बारबैले, कृष्णा महाराज आरगडे, अर्जुन महाराज पुरी, जिल्हा परिषद सभापती अनुराधा चव्हाण, माजी सभापती डॉ. सारंग गाडेकर यांची उपस्थिती होती. तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामेश्वर संस्थांचे अध्यक्ष बाबूराव तरटे, शालीकराव बोडखे, दादाराव पवार, दादाराव दानवे, सोनू आप्पा लकडे, गंगाराम हवळे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The prestige of five idols on Lohgad in excitement