आयएमएच्या अध्यक्षपदी डाॅ. संतोष रंजलकर यांची फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:37+5:302021-05-15T04:04:37+5:30
औरंगाबाद : इंडियन मेडिकल असोसिएशन, औरंगाबाद शाखेची नवी कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर झाली. कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या कार्यकारिणीची नियोजन समितीने फेरनिवड ...

आयएमएच्या अध्यक्षपदी डाॅ. संतोष रंजलकर यांची फेरनिवड
औरंगाबाद : इंडियन मेडिकल असोसिएशन, औरंगाबाद शाखेची नवी कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर झाली. कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या कार्यकारिणीची नियोजन समितीने फेरनिवड केली. अध्यक्षपदी डॉ. संतोष रंजलकर यांची सलग दुसऱ्या वर्षी, तर डॉ. यशवंत गाढे हे सलग चौथ्या वर्षी सचिवपदाची जबाबदारी सांभाळतील.
उपाध्यक्षपदी डॉ. अनुपम टाकळकर, महिला उपाध्यक्ष डॉ. उज्ज्वला दहिफळ, तर कोषाध्यक्ष म्हणून डॉ. हरमीत सिंग बिंद्रा हे काम पाहणार आहेत. डॉ. संजीव सावजी हे बिल्डिंग आणि प्लॉट कमिटीचे अध्यक्षपद भूषवतील. सहसचिव प्रशासन पदावर डाॅ. सचिन सावजी, सहसचिव क्लिनिकल डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. मंजुषा शेरकर, सांस्कृतिक सहसचिव, डॉ. प्रफुल्ल जटाळे क्रीडा सहसचिव, तर डॉ. सत्यनारायण सोमाणी हे माजी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करतील. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीदेखील इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद शाखा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयएमए शासन आणि सर्वसामान्य जनतेला शक्य ती मदत करेल, अशी ग्वाही फेरनिवड झालेल्या सदस्यांनी दिली. माजी अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, डॉ. कुलदीपसिंग राऊळ, डॉ. सत्यनारायण सोमाणी, डॉ. रमेश रोहिवल, डॉ. राजेंद्र गांधी यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.