शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 18:26 IST

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला

- संजय जाधव

पैठण: जायकवाडी धरणातून सिंचनासाठी यंदा ३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग डाव्या व उजव्या कालव्यातून करण्यात आला असून नियमित सर्व आवर्तने सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. १ जून २०२३ रोजी जायकवाडी धरणात ३७.२२% जलसाठा शिल्लक असून गतवर्षी आजच्या तारखेला धरणात ३८.३५% जलसाठा होता. यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तब्बल ९.७४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे. एकंदरीत १ जून २०२२ ते १ जून २०२३ या जलवर्षात जलसाठ्यातून ५४.३६ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणातून तब्बल ११३ दिवस विसर्ग सुरू होता. या कालावधीत २०९ टीएमसी   धरण दोन वेळेस भरेल ईतक्या पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला होता. जायकवाडी प्रशासनाने योग्य नियोजन करून पुरपरिस्थिती टाळून शेवटच्या टप्प्यात धरण १००% भरून ठेवले होते. यामुळे धरणावर अवलंबून असलेला औद्योगिक क्षेत्रासहीत पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेती सिंचन, उपसा योजनांना नियमितपणे पाणी पुरवठा केल्यानंतरही १ जून रोजी धरणात १५४६.०२२ दलघमी ( ५४.१९ टीएमसी) जलसाठा शिल्लक राहिला आहे.  

१० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन....कमी खोलीचा व  उथळ असा विस्तीर्ण पानपसारा लाभल्याने नाथसागराच्या जलाशयात खोलवर सुर्य किरणे पोहचतात ; यामुळे   बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्पाकडे पाहिले जाते. यंदा  तापमानात वाढ झाल्याने १ जून पर्यंत २७६.९०५ दलघमी (९.७४ टीएमसी ) पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. आजच्या तारखेपर्यंत झालेले हे सर्वाधिक बाष्पीभवन आहे. निळवंडे प्रकल्पाची क्षमता ११ टीएमसी ऐवढी आहे यावरून बाष्पीभवनाने धरणातून किती पाण्याचा अपव्यय होतो याची तीव्रता समोर येते.

पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्राला लागते केवळ चार टीएमसी....१०२ टीएमसी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातील जलसाठ्याची औद्योगिक क्षेत्र व पिण्याचा पाणीपुरवठा होणाऱ्या जनतेला मोठी काळजी असते. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही क्षेत्राला केवळ ४ टीएमसी पाणी लागते. यंदा १ जून अखेर दोन्ही क्षेत्रास मिळून ९७.४४ दलघमी ( ३.४४ टीएमसी) पाण्याचा पुरवठा धरणातून करण्यात आला तर विविध उपसा जलसिंचन योजनांनी ७.७९ टीएमसी जलसाठा ओढल्याचे  धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

पुर नियंत्रण कक्ष सुरु १ जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होते. यामुळे गुरूवारी धरणावर पुर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून जबादाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पूर्ण हंगाम होईपर्यंत २४ तास दक्ष राहून नियंत्रण कक्षात पाणलोट क्षेत्रातील व धरणाच्या नोंदी घेण्यात येतात. कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता विजय काकडे यांनी नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरूवारी सूचना व मार्गदर्शन केले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी