उमेदवारांच्या उपस्थितीत उद्या मतदान यंत्र होणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 00:20 IST2017-04-15T00:20:05+5:302017-04-15T00:20:52+5:30
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़

उमेदवारांच्या उपस्थितीत उद्या मतदान यंत्र होणार सील
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़ प्रशासनाकडून मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर रविवारी सकाळी ९़३० वाजता बार्शी रोडवर असलेल्या महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँग रुमवर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्र सील केली जाणार आहेत़ मनपा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने तब्बल दोन हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत़ पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे़ रविवारी ४०७ उमेदवारांचे निवडणूक चिन्ह असलेले मतदान यंत्र प्रशासनाकडून सील केली जाणार असल्याचे आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले़