शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

नामांतर लढ्यात ‘लाँग मार्च’ची तयारी केली पण क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल

By विजय सरवदे | Updated: January 14, 2023 20:08 IST

‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता.

नामांतर लढ्याला प्रेरणादायी इतिहास आहे. दलित पँथरसह अनेक पुरोगामी संघटना आणि कार्यकर्ते हा लढा नेटाने रेटून नेत होते. दुसऱ्या बाजूने विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून नामांतराला कडाडून विरोध करीत होते. या लढ्यात मराठवाड्यातील दलितांची हजारो घरे बेचिराख झाली, अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यांचे स्मरण आणि तब्बल १७ वर्षे चाललेल्या या लढ्याचा विजयोत्सव म्हणून दरवर्षी दि. १४ जानेवारीला विद्यापीठ नामविस्तार वर्धापन उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मान्यवरांच्या काही आठवणी...

क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल प्रा. प्रकाश सिरसाट सांगतात, ‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता. औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात असलेल्या वसंत भुवन सभागृहात नामांतरवादी विद्यार्थी नागरिक कृती समितीच्या वतीने २२ जुलै १९७९ रोजी नामांतर परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत महाराष्ट्रातील नामांतरवाद्यांनी आपापल्या ठिकाणाहून पायी निघून औरंगाबादला यावे व दि. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतिचौकात सत्याग्रह करावा, असा कार्यक्रम घोषित करण्यात आला. यालाच ‘लाँग मार्च’ असे नाव देण्यात आले. नामांतर वादी कृती समितीचा भाग म्हणून याच्या प्रचाराची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली होती. इतरत्र बरेच फिरून झाले होते. 

शेवटचा दौरा म्हणून दि. ४ डिसेंबर रोजी मी येवल्याच्या गेलो. तिथे राष्ट्र सेवा दलाच्या मोठा गट सक्रिय होता. सायंकाळी त्यांची बैठक सुरू झाली. माझा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली. संघटनेच्या भूमिकेच्या विरोध जाऊन त्यांनी सत्याग्रहात सहभागी होण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवसी सकाळीच औरंगाबादला जाण्यासाठी बस होती. तिने निघायचे ठरले. सकाळी बसस्टँडला पोहोचलो, बस उभीच होती. आत पाहिले तर बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. ड्रायव्हर, कंडक्टरही नव्हते. मनात शंका उद्भवली. ही बस एवढी रिकामी कधीच नसे. विचार करायला वेळ मिळावा म्हणून मुतारीकडे गेलो. आजूबाजूला साध्या वेशातील दोन पोलिस असल्याचे जाणवले. त्यातला एक तर औरंगाबादपासून मागावर असावा. इतरांना बसमध्ये चढू नका असे सांगावे म्हणून निघालो, तोपर्यंत निम्म्याहून अधिक कार्यकर्ते जागा पकडून बसले होते. मी बसजवळ जाईपर्यंत सगळेच आत बसलेले होते. तिथून निघावे, तर पळ काढला अशी कार्यकर्त्यांची समजूत व्हायची आणि थांबलो तर पोलिस पकडणार आणि आपण सत्याग्रहाला मुकणार अशा विचारात थांबायचे ठरवले. 

क्षणात पोलिसांनी बस ताब्यात घेतली आणि औरंगाबाद ऐवजी आमचा प्रवास येवला पोलिस स्टेशनच्या दिशेने सुरू झाला. दुपारपर्यंत लिखापढी पूर्ण करून आम्हाला पोलिस व्हॅनमध्ये बसवले. कुठे नेतायेत ते कळत नव्हते. आमच्यासोबत नुकतेच महाविद्यालयात प्रवेश घेतलेले काही लहान मुले आणि मुली होत्या. त्या रडू लागल्या. शेवटी सायंकाळच्या सुमारास आम्ही नाशकात पोहोचलो. आमची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. अशारीतीने पोलिसांच्या नकली बसच्या जाळ्यात आम्ही सहज सापडलो.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण