पिण्याच्या पाण्यासाठी कृती आराखडा तयार करा
By Admin | Updated: November 17, 2014 12:26 IST2014-11-17T12:26:07+5:302014-11-17T12:26:22+5:30
जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध राहण्याच्या हेतूने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी दिले.

पिण्याच्या पाण्यासाठी कृती आराखडा तयार करा
परभणी: जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध राहण्याच्या हेतूने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी दिले.
जिल्ह्याचे पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी १५ नोव्हेंबर रोजी परभणीत भेट देऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी एस. पी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी, चारा टंचाईवर करावयाच्या उपाययोजनेविषयी त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले, शेतकर्यांनी कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत, कमी पाण्यावर व लवकर उपलब्ध होणारा चारा घेऊन जनावरांच्या वैरणासाठी टंचाई भासू देऊ नये, यासाठी त्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.