मतमोजणीची तयारी पूर्ण; आज होणार रंगीत तालीम

By Admin | Updated: October 18, 2014 00:05 IST2014-10-18T00:03:15+5:302014-10-18T00:05:13+5:30

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

Preparation for counting is complete; Today will be Collegiate training | मतमोजणीची तयारी पूर्ण; आज होणार रंगीत तालीम

मतमोजणीची तयारी पूर्ण; आज होणार रंगीत तालीम

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी मतमोजणीची रंगीत तालीम उद्या शनिवारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान घेण्यात आले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे त्या- त्या मतदारसंघाच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली. प्रशासनाने मतमोजणीची संपूर्ण तयारी केली असून त्यासाठी जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवर टेबलनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर १४ टेबल लावण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांची सरमिसळ करणार
रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्यात येणार आहे. एका मतदारसंघातील निवडणूक कर्मचारी दुसऱ्या मतदारसंघात, तर दुसऱ्या मतदारसंघातील निवडणूक कर्मचारी तिसऱ्या मतदारसंघात जाणार आहेत.

Web Title: Preparation for counting is complete; Today will be Collegiate training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.